शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसरातील अनेक मध्यम व लघु तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

मागील तीन वर्षांत तत्कालीन शासनाने पाणीटंचाई व भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. परंतु, तरीही करडी परिसरात योजनेचा फारसा परिणाम अजूनही दिसून येत नाही. मध्यम स्वरुपाच्या तलावात पर्याप्त जलसाठा निर्माण करण्यात ही योजना फारशी यशस्वी ठरली नाही. शासकीय यंत्रणा व कंत्राटदारांपुरतीच योजना मर्यादित ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांत व्यक्त होत आहेत. 

ठळक मुद्देपाणी टंचाईचे सावट : उन्हाळी शेतीचे सिंचन धोक्यात

लाेकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी पारा चढताच करडी परिसरातील मध्यम तलावांना कोरड पडली आहे. पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने जनावरे व गरजांसाठी आवश्यक पाण्याबरोबर गावागावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. मागील तीन वर्षांत तत्कालीन शासनाने पाणीटंचाई व भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. परंतु, तरीही करडी परिसरात योजनेचा फारसा परिणाम अजूनही दिसून येत नाही. मध्यम स्वरुपाच्या तलावात पर्याप्त जलसाठा निर्माण करण्यात ही योजना फारशी यशस्वी ठरली नाही. शासकीय यंत्रणा व कंत्राटदारांपुरतीच योजना मर्यादित ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांत व्यक्त होत आहेत. यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली, तर मध्यम स्वरूपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कमी खोलीच्या विहिरीसुद्धा कोरड्या पडल्यात, तर मध्यम खोलीच्या विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गात आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून खोदकाम झालेले नाले आज उथळ आहेत. खोदलेली माती नाल्यांच्या काठावरच टाकल्याने, तसेच माती पसरविण्यात न आल्याने नाल्याची पाणी साठवण क्षमता वाढलेली नाही. तलावातून कंत्राटदारांनी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून काळेबेरे केल्याने पाहिजे तसा उपसा झालेला नाही. परिणामी यावर्षी चांगला पाऊस झालेला असतानाही नाले व मध्यम स्वरुपाचे तलाव पाण्याविना एप्रिल महिन्यातच कोरडे पडले आहेत, तर अधिक सिंचनामुळे मोठ्या स्वरुपाचे तलाव मे महिन्यातच चटका बसताच कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनाचा परिणाम भविष्यात भोगावा लागण्याची शक्यता असल्याने उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. सध्या एप्रिल महिन्याच्या तिसरा आठवडा सुरु आहे. मे महिन्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे.

जलसाठे वाढविणारी नवी योजना राबवातत्कालीन युतीच्या शासनाने राबविलेली व मोठा गाजावाजा करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना पर्याप्त जलसाठे निर्माण करण्यात अशस्वी ठरली. विद्यमान महाविकास आघाडी शासनानेसुद्धा तसा ठपका ठेवत खुली चौकशी करण्याची घोषणा केली. मात्र, सिंचन साठे निर्माण करणारी नवी योजना आघाडीच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेली नाही. आघाडी शासनाने निव्वळ कुरघोडीचे राजकारण न करता शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय देणारी एखादी ठोस योजना राबवून सिंचन क्षमता वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प