शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसरात अतिवृष्टीचा अनेक घरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:47 IST

मागील दोन दिवसांपासून करडी व पालोरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. भिंती कोसळल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकौलारू घरांची स्थिती चिंताजनक : आपादग्रस्तांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मागील दोन दिवसांपासून करडी व पालोरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. भिंती कोसळल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.मोहाडी तालुक्यातील केसलवाडा येथे भागरथा देवाजी शेंदरे (६०), पालोरा येथील शांताबाई सुखदेव भोयर (६२), गंगाबाई येबल हलमारे (६५) तर जांभोरा येथील बयनाबाई विठोबा मुंगमोडे यांचे संपूर्ण घर क्षतीग्रस्त झाले. याप्रकरणी महसुल विभागाने नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे. करडी परिसरात २० आॅगस्ट रोजी सुमारे ७६ टक्के पावसाची नोंद झाली. तलाव, नदी, नाले, ओव्हरफलो झाले. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. केसलवाडा येथील भागरथा शेंदरे तर जांभोरा येथील बयनाबाई मुंगमोडे यांचे मातीचे कौलारु घर कोसळल्याने त्यांच्यासमोर राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. माती व कौलांसह फाटे पडल्याने मातीत भांडे दबल्या गेले.पालोरा येथील शांताबाई भोयर यांचे घर पावसामुळे जमीनदोस्त झाले तसेच गंगाबाई हलमारे यांच्याही घराचे नुकसान झाले. प्रकरणी तलाठ्यांना माहिती देण्यात आली असून पंचनामा करण्यात आला. आपादग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई व घरकुल देण्यात यावे, अशी मागणी पालोरा येथील सरपंच महादेव बुरडे, सदस्य भोजराम तिजारे, जांभोराचे सरपंच भुपेंद्र पवनकर तर केसलवाडाचे सरपंच सुनिता हातझाडे यांनी केली आहे.