शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

जिल्ह्यात तब्बल २७७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

रविवारी भंडारा तालुक्यात १५१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच साकोली तालुक्यात २४, लाखांदूर सात, तुमसर २२, मोहाडी व पवनी तालुक्यात प्रत्येकी २६ तर लाखनी तालुक्यात २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यात आतापर्यंत २५९० व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले. साकोली ३४४, लाखांदूर २११, तुमसर ४६७, मोहाडी ४७८, पवनी ४०५, लाखनी ४५९ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देभंडारा तालुक्यातील दोघांचा मृत्यू : रुग्ण संख्या पोहचली ४९५० वर, आतापर्यंत २९५९ जणांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असून रविवारी तब्बल २७७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच भंडारा तालुक्यातील दोन जणांचा कोरोनाने आयसोलेशन वॉर्डात मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे आतापर्यंत १०३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.रविवारी २७७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. यात सर्वाधिक १५१ व्यक्ती भंडारा तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४९५० वर पोहचला असून आतापर्यंत २९५९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. उपचाराखालील रुग्णांची संख्या १८८८ इतकी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १८० व्यक्ती दाखल आहे. भंडारा तालुक्यातील ६५ वर्षीय महिला व ५० वर्षीय पुरूषाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात कोरोनामुळे मृत्यू झाला.रविवारी भंडारा तालुक्यात १५१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच साकोली तालुक्यात २४, लाखांदूर सात, तुमसर २२, मोहाडी व पवनी तालुक्यात प्रत्येकी २६ तर लाखनी तालुक्यात २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यात आतापर्यंत २५९० व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले. साकोली ३४४, लाखांदूर २११, तुमसर ४६७, मोहाडी ४७८, पवनी ४०५, लाखनी ४५९ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्याचा मत्यूदर दोन टक्केजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्यू दर दोन टक्के एवढा आहे. आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डातून २०८१ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत अ‍ॅन्टीजेन व आरटीपीसीआर कीटद्वारे ४१०३१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १२५५ जणांचे अहवाल अप्राप्त आहेत. दरम्यान रविवारी ७१ जणांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लक्ष १९ हजार ४८७ नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोनाबाबत जनजागृतीही केली जात आहे.पवनीतील कोवीड तपासणी केंद्रावर गैरसोयपवनी : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंतर्गत पवनी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात कोवीड-१९ तपासणी केंद्रसुरु करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने टेस्ट सेंटरवर येवून तपासणी करीता उपस्थित राहणे सुरु केले आहे. तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे. पालिका प्रशासनाच्या मालकीचे राजीव गांधी सभागृह असतांना कोवीड-१९ टेस्ट सेंटर ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरु करण्यात आले आहे. गर्भवती महिला व लहान बाळांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना तपासणी करीता आल्यावर बसण्याची व्यवस्था नाही. नागरिक त्यांचे सोयीनुसारजमीनीवर बसून प्रतिक्षा करीत असताना आढळून आले. तपासणी करीता आलेल्या नागरिकांनी टेस्ट सेंटरवरील गैरसोय पाहून लोकमत प्रतिनिधीकडे प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या