भंडारा : मकसरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात नॉयलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला. मुंबई -कोलकाता या ५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाव असलेल्या लाखनी शहरातील उड्डाण पुलावरून दुचाकीने गोरेगावकडे जाणाऱ्या युवकाच्या गळ्यात नॉयलॉन मांजा अडकला. यामुळे गळा कापला गेल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन तो उड्डाणपुलावरच पडला.
ही घटना सोमवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली. शुभम जियालाल चौधरी असे या २४ वर्षीय युवकाचे नाव असून तो गोरेगाव (जि. गोंदिया) येथील रहिवासी आहे. त्याला नागरिकांनी नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.