शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

एका कुटुंबाच्या वास्तव्याचे ‘मंडेकसा’ गाव...

By admin | Updated: March 4, 2017 00:25 IST

एक आटपाटनगर होते, त्या नगराच्या सभोवताल जंगल होते, त्या जंगलाजवळ नवरा-बायको दोन पोरांसोबत राहत होते.

हिंस्र श्वापदांच्या सानिध्यात चौघे कंठतात जीवन : तुमसर तालुक्यातील सोरना गट ग्रामपंचायतीतील प्रकारप्रशांत देसाई भंडाराएक आटपाटनगर होते, त्या नगराच्या सभोवताल जंगल होते, त्या जंगलाजवळ नवरा-बायको दोन पोरांसोबत राहत होते. जंगल असल्याने त्यांच्या घराजवळ दररोज वाघ, हरीण, बिबट, ससे असे प्राणी येत होते. परंतु ते त्यांना न भीता राहत होते, अशा आशयाच्या दंतकथा लहानपणी खूप ऐकल्या. परंतु आता वास्तवात या कथानकानुसार एखादे कुटुंब जंगलाच्या सानिध्यात राहते, असे म्हटल्यास त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. तुमसर तालुक्यातील सोरना ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंडेकसा या गावाची सध्याची स्थिती एखाद्या चित्रपट किंवा दंतकथेप्रमाणेच आहे. अवतारसिंग लखनसिंग मडावी यांचे याच गावात वास्तव्य आहे. अवतारसिंग हे पत्नी मंगला व साहिल व किशोर या दोन मुलांसह जंगलाच्या मधोमध असलेल्या शेतात कौलारू घर बांधून राहत आहेत. एका गावात केवळ एक कुटुंब वास्तव्याला राहणे ही आकलनापलिकडील बाब असली तरी हे सत्य आहे. घनदाट जंगलाच्या सानिध्यात पती-पत्नी व दोन चिमुकल्यांसह अवतारसिंग मडावी संसारात मग्न आहेत. अवतारसिंगचे पूर्वजांचे येथे वास्तव्य होते. त्यांचा भाऊही येथे राहत होते. मात्र, एका कुटुंबासह राहत असताना हिंस्त्र श्वापदांपासून जीवाला होणारा संभाव्य धोका व सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्यांनी गाव सोडले. भाऊ आता गोवारी टोला येथे राहतात. अवतारसिंग यांची दोन्ही मुले पिटेसूर येथील शाळेत शिकतात. दोघांनाही ते रोज सकाळी शाळेत सोडतात व सायंकाळी नित्यनेमाने आणायला जातात. दरम्यानच्या काळात पती-पत्नी शेतात राबतात. वर्षाला चांगले उत्पादन घेऊन समाधानकारक जीवन जगत आहेत. एका कुटुंबाचे गाव असल्याने त्यांना शौचासाठी जाण्यासाठी पूर्णपणे मोकळीक होती. कुठेही शौचक्रिया उरकल्यास त्यांना बोलणारे कुणीही नव्हते. जागाही मुबलक असल्याने तसे शौचालय बांधण्याची गरज नव्हती. मात्र, अवतारसिंगने शेतातील घरासमोर शौचालय बांधण्याला प्रारंभ केला आणि सर्वाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. अवतारसिंगने या बाबीला डोळेझाक करून शेतातील घरासमोर त्यांनी एक शौचालय बांधकाम करण्याला प्रारंभ केले असून बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असूनही शौचालय बांधकामासाठी जे टाळाटाळ करतात किंवा ते बांधूनही त्याचा वापर करीत नाही, अशांसाठी अवतारसिंगने केलेले स्वच्छतेचे कार्य ही एक चपराक आहे. मातीचे उपकार फेडण्यासाठी करतात शेती.....मंडेकसा या गावात आई-वडीलांनी बांधलेल्या घरात जन्मलेल्या व गावातील मातीत खेळून लहानाचा मोठा झालेल्या अवतारसिंगने गाव सोडले नाही. ज्या मातीने घडविले, त्या घराचे, मातीचे किंबहूना गावाचे उपकार आयुष्यात विसरणार नाही. ज्यांच्यामुळे हे जग बघायला मिळाले, त्यांना सोडणे म्हणजे आयुष्याशी गद्दारी करण्याचा प्रकार असल्याचे अवतारसिंग यांचे म्हणणे आहे. मातीचे उपकार फेडण्यासाठीच गावात राहून शेती करून कुटुंबाचा गाडा चालवित आहे. हाताला काम मिळावे म्हणून अनेक जण गाव सोडून बाहेरगावी जातात. त्यानंतर ते गावाकडे फिरकत नाहीत, अशांसाठी अवतारसिंग यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.अवतारसिंग हागणदारीमुक्तीचा ‘आयकॉन’ हागणदारीमुक्तीची चळवळ सर्वत्र उभी झालेली आहे. अवतारसिंगचे नाव शौचालय बांधकामाच्या यादीत आल्याने सरपंच ग्यानीराम शेंडे, उपसरपंच सुधीर डोंगरे, ग्रामसेवक मंगेश शेरकी यांनी त्यांना शौचालयाचे महत्व सांगितले. त्यानंतर स्वच्छता मिशन कक्षाचे राजेश्वर येरणे, पल्लवी तिडके, शशिकांत घोडीचोर, वर्षा दहीकर यांनी शौचालयाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर अवतारसिंगने शौचालयाचे बांधकाम सुरू केले. अनेक कारण पुढे करून शौचालयाला फाटा देणाऱ्यांसाठी अवतारसिंग यांचे कुटुंबच समाजासाठी ‘आयकॉन’ ठरावे, असा त्यांनी घेतलेला पुढाकार आहे.