शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 17:56 IST

आज सकाळच्या सुमारास तो जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील झुडपात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला.

ठळक मुद्देइंदोरा जंगल परिसरातील घटना

लाखादूर (भंडारा) : सकाळी जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या एका जणाला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना आज (दि. ५) दुपारी २ च्या सुमारास तालुक्यातील इंदोरा ते अरुणनगर मार्गावरील जंगल परिसरात उघडकीस आली. यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जयपाल घोगलु कुंभरे (वय ४०, रा इंदोरा) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघाच्या हल्ल्यात इसम ठार होण्याची ही लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास तो जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील झुडपात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. यावेळी वाघ त्याला तब्बल २०० मीटर अंतरावर फरफटत नेत त्याचा ऊजवा पाय फस्त केला. 

दरम्यान, सकाळच्या सुमारास मोहफूल वेचायला गेलेला जयपाल दुपारी होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी जंगल परिसरात त्याचा शोध घेतला असता त्यांना जयपालचा मृतदेह आढळून आला. याची माहिती स्थानिक लाखांदूर वन विभागासह पोलिस प्रशासनाला देण्यात आली. यानंतर पोलिसांसह वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

दरम्यान, ही तालुक्यातील ही दुसरी घटना अल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी दहेगाव जंगलात सरपण गोळा करण्यासाठी सकाळच्या सुमारास गेलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीला वाघाने हल्ला करुन ठार केले होते. तर, आज वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून नरभक्षी ठरलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूbhandara-acभंडारा