शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा गळा चिरून खून करून पतीची आत्महत्या; दोन चिमुकली मुले झाली पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 10:27 IST

तुमसर तालुक्यातील सीतासावंगीची घटना

तुमसर (भंडारा) : पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून पतीनेही स्वत:चा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सरिता सुरेश बोरकर (३७) असे पत्नीचे तर सुशील नीलकंठ बोरकर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. दोघेही गोबरवाही रोडवरील सीतासावंगी येथे राहायचे. सुशीलचा अंडी विक्रीचा व्यवसाय आहे. सरिता आशा सेविका म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होती. काही दिवसांपासून सुशील हा आर्थिक विवंचनेत सापडला असल्याची माहिती आहे. याच आर्थिक तंगीतून त्याने हे कठोर पाऊल उचलल्याचे कळते.

गुरुवारी रात्री सुशील, सरिता व त्यांची दोन्ही मुले झोपी गेली. मुले एका खोलीत तर दोघेही पती- पत्नी दुसऱ्या खोलीत होते. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास मुलांची शाळेत परीक्षा असल्याने दोघेही लवकरच जागे झाले. मात्र, आई- वडील जागे झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी आवाज दिला. मात्र, बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने मुलांनी शेजारी राहणारे मोठे वडील अनिल बोरकर यांना बोलाविले. अनिलनेही आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घराच्या मागचा दरवाजा तोडला. तेव्हा खोलीतील दृश्य अत्यंत थरारक होते.

पती - पत्नी रक्ताच्या थाराेळ्यात

खाेलीचे दार ताेडताच आतमध्ये पती- पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. सरिता बिछान्यावर तर सुशील खाली गळा चिरलेल्या अवस्थेत दिसून आला. या प्रकाराची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आतून दार बंद असल्याने बाहेरून कुणी व्यक्ती खोलीत येण्याची शक्यता नव्हती. तसेच खोलीत एक ब्लेड आढळून आला. त्यामुळे पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून सुशिलनेही त्याच ब्लेडने आपला गळा चिरून आत्महत्या केल्याचा संशय आहे. तसचे सुशीलचे ब्लेडने बोट चिरलेले आढळून आले. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास ठाणेदार दीपक पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारbhandara-acभंडारा