संघर्ष संपला : अनिकेतने गमावला आधारलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आपल्या हयातील लेकरांच सुख बघावं. उंच भरारी घ्यावी. स्वबळावर उभे राहून सन्मानाने जीवन जगावं अशी इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते. पण, लेकरू सुख, समृद्धीच्या रेषेजवळ जाण्यापूर्वीच जन्मदात्याने वडिलाने कायमचे डोळे मिटवावे, असा दुर्देवी प्रसंग बोथली येथील अनिकेत फुलबांधे या मुलावर आला.बाळाच्या जन्मानंतर आई-वडिल मुलांना आपापल्या परीने जपत असतो. त्याला कोणतेच दु:ख होवू नये याची काळजी घेतो. शिक्षण क्षेत्रात मुलाने पाऊल टाकले की आई-वडील त्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवीत असतो. शिकूण नोकरीला लागव. तो सुखी व्हाव, समृद्धी होवून स्वबळावर उभा राहाव किंबहूना म्हातारपणात आपला आधार बनावा, अशी अपेक्षा प्रत्येक आई वडिलांची असते. पण, या अपेक्षेला नियती फोल ठरविते. अशाच या नियतिने बोथली या गावातील ताराचंद फुलबांधे या वडिलाचा घात केला. मुलाच्या भविष्यातील स्वप्ने आकार घेत पुढे जात असताना रात्री देवजूा करीत असताना ताराचंद फुलबांधे (६५) यांना हृदयघात झाला. यातच त्यांनी कायमचे डोळे बंद केले अन् ते कायमचे देवाघरी गेले.ताराचंद फुलबांधे याचा छोटा कुटूंब, पत्नी दोन मुली, एक मुलगा. प्रारंभापासूनच घरात अठराविश्व दारिद्रयाचे जगणे. पण, आयुष्यात आपल्या वाट्याला आले ते सर्व क्षण आनंदाने काढणे असंच त्यांच सुरू होतं. जातीने ते न्हावी होते. परंपरागत व्यवसाय त्यांनी जोपासला. पण, हा व्यवसाय जोपासत असतानी त्यांचा कुठेही नेमकी सलूनची दुकान नव्हती. दुकान लावण्याची त्यांच्याकडे ऐपत नव्हती. त्यामुळे परीक्षेत्रातील गावात सकाळी पायी चालत जायचे. गावात जावून खाली काही पोते पसरवून केश कर्तन, दाढी करण्याचा दिनक्रम राहायचा. तसेच रिवाजानुसार साक्षगंध, लग्नात सर्व रितीरिवाज पार पाडायचे काम करायचे. शिवाय आजुबाजूच्या खेड्यात कुणाचे निधन झाले तर धर्मशास्त्राप्रमाणे मुंडन करण्यासाठी सुद्धा जात होते. या सगळ्या कार्यातून उदरनिर्वाह करीत होते. ताराचंद फुलबांधे यांच्या मुलीचा लग्न यापूर्वी होवून गेला. लहान अनिकेत यावर्षी लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय भंडारा येथे बारावीला गेला आहे. मागील वर्षी मोहगाव देवी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल येथून मेरीट आला होता. याची दखल घेवून अनिकेतच्या संघर्षाला साथ दिली. मुंबईत एका समारंभात राज्यपाल, शिक्षणमंत्री, नामवंत नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्याच चॅनलच्या माध्यमातून राज्यातील अनेक व्यक्तींना अनिकेतच्या आर्थिक मदतीचा हात दिला. त्या मदतीच्या बळावर आपल्या आई बाबांची स्वप्ने साकारण्यासाठी भंडाराच्या शासकीय वस्तीगृहात राहत होता. कमी पैशात शिकवणीसाठी त्याला विविध कोचिंग क्लॉसमध्ये मदत होत आहे. आई-वडिलांच्या स्वप्न वास्तव्यात उतरविण्यासाठी अनिकेत प्रचंड मेहनत करीत आहे. आपल्या वडिलांचा आशिर्वाद नेहमीच, सदैव राहावा व वडिलांच्या गरीबीचे दिवस पालटून टाकण्यासाठी अनिकेतने त्या दिशेने प्रवासही सुरू केला होता. पण, अनिकेतच्या डोक्यावरचा आशिर्वादाचा हात नियतिने हिरावून नेला. मरणानंतर हिंदू रितीप्रमाणे मुंडन क्रिया करणारे, ताराचंद फुलबांधे यांच्या मृत्यु झाला. अनेकांचे केशवपनक्रिया करणाऱ्या ताराचंद फुलबांधे यांच्या मुलावर मुंडन करण्याची दुर्देवी वेळ आली आहे. वडिलानंतर अनिकेतला माया देणाऱ्या वृद्ध आईवर दु:ख कोसळले आहे.
कर्तृत्व बघण्याआधीच मालवली प्राणज्योत
By admin | Updated: May 26, 2017 02:00 IST