शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

हिवताप : ३४ गावे अतिसंवेदनशील

By admin | Updated: June 10, 2014 23:51 IST

डासांपासून होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महिनाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरम्यान हिवतापाचा उद्रेक होऊ नये, यासाठी अतिसंवेदनशील श्रेणीतील ३४ गावात

तपासणीसाठी आरडीके किट : आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात जनजागृती मोहीम भंडारा : डासांपासून होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महिनाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरम्यान हिवतापाचा उद्रेक होऊ नये, यासाठी अतिसंवेदनशील श्रेणीतील ३४ गावात आरोग्य विभागाकडून धूर फवारणी करण्यात येणार आहे. ही मोहीम १७ जूनपासून आरंभ होईल, अशी माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.२४ ठिकाणी रक्त नमुने तपासणीजिल्ह्यात २४ ठिकाणी हिवतापाच्या रुग्णाचे रक्तनमुने तपासण्यात येतात. याठिकाणी संशयित रुग्णांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करुन उपचार केले जातात. त्याअंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक गावात आरोग्य कर्मचारी ‘गृहभेट’ देऊन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. तपासणीसाठी आरडीके किटयावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे आणि जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.देवेंद्र पातुरकर माहिती देताना म्हणाले, हिवताप रुग्णांचे रक्त नमुने तातडीने तपासण्यासाठी आरडीके (रॅपीड डाइग्नोस्टिक किट) आली आहे. या कीटमुळे करण्यात येणारे परिक्षण परिपूर्ण नसले तरी मलेरियाचे लक्षण ओळखण्यासाठी पुरेशी आहे. ही कीट जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि आशा सेविकांजवळ उपलब्ध करण्यात आले आहेत. डासांपासून होणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृष्य ताप, चंडीपुरा आणि इन्सेफ्लाईटिस (मस्तिष्क ज्वर) यामुळे मृत्यू होऊ शकतो असे सांगून मलेरिया या आजारापासून सन २००८ नंतर कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. जानेवारी २०१४ ते मे महिन्यापर्यंत झालेल्या तपासणी मोहिमेत भंडारा जिल्ह्यातील ३४ गावे मलेरिया आजारासंदर्भात अतिसंवेदनशील असल्याचे उघडकीला आले आहे. या सर्व ३४ गावांमध्ये किटकनाशकाची फवारणी करण्यात येणार आहे. या गावातील ४५,४३७ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फवारणी करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील ३४ गावांच्या यादीमध्ये पवनी तालुक्यातील बेटाळा, आमगाव, ठाणेगाव, रोहणा, परसोडी, चांदी, सिंदपुरी, सायतानगर या गावांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील पागोरा, सिरसघाट, करचखेडा, कोका तर मोहाडी तालुक्यातील पांजरा, लेंडेझरी (जांभोरा), फुटाळा व पाचगाव या गावांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील लेंडेझरी, लाखनी तालुक्यातील गडेगाव, सोनेखारी, दैतमांगली, रेंगेपार, मेंढा तर लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव, दांडेगाव, मानेगाव, पारडी व साकोली तालुक्यातील न्याहारवानी, सानगाव, नैनपूर, महालगाव, विरसी, सीतेपार, साकोली व गिरोली गावाचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)