करडी (पालोरा) : गोपालकांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून पशुप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. निव्वळ रोड, रस्ते आणि इमारतीचे बांधकाम म्हणज ेविकास नव्हे. सर्वांगीण विकास झाला पाहिजे. जिल्हा परिषद मधून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी सुरु केल्या, जिल्हा परिषद आपल्या दारी मधूनही लोकांपर्यंत योजना पोहचविण्यात आल्या. बेरोजगार तरुणांनी या प्रदर्शनीतून शिकून, अनुभव घेऊन शेतीसोबत जोडधंदा सुरु केला पाहिजे. प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.करडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती मोहाडी अंतर्गत पुशसंवर्धन विभागाचेवतीने आयोजित पशुप्रदर्शनी, संकरित वासरे, म्हशी, शेळ्या कोंबड्या व गोपालकांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती संदिप ताले म्हणाले, शेतीला जोडधंदा म्हणून प्रत्येकाने पशु-पक्ष्यांचे पालन केले पाहिजे. त्याला उद्योगाचा, व्यवसायाचा दर्जा दिला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.प्रदर्शनी व मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार चरण वाघमारे तर अध्यक्षस्थानी सभापती संदिप ताले होते. प्रमुख अतिथी स्वामी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे, बाबू ठवकर, सभापती विणा झंझाड, उपसभापती उपेश बांते, खंडविकास अधिकारी डी.व्ही. आगलावे, पशु आयुक्त डॉ. वासनिक, सहाय्यक आयुक्त डॉ. नितीन ठाकरे, पशुधन विकास अधिकारी कु. चंदा दिपटे, जिल्हा पशुअधिकारी डॉ. राजू शहारे, युवराज जमईवार, पंचायत समिती सदस्य विलास गोबाडे, सरपंच सिमा साठवणे, उपसरपंच चंद्रकांत सेलोकर, भाष्कर गाढवे, सर्व करडी ग्रामपंचायत सदस्य माजी सभापती झगडू बुध्दे, रामकृष्ण शेंडे, पुरुषोत्तम कावळे, सरपंच मिरा टेकाम, निर्मला चकोले, कवळू मुंगमोडे, रमेश गोबाडे प्रामुख्याने हजर होते.मेळाव्याला तालुक्यातील ५०० च्यावर पशुनी व हजारो गोपालकांनी उपस्थिती दर्शविली. मंडळ कृषी विभागाचे वतीने सुध्दा विविध फळा-फुलांचे स्टॉल लावले गेले. मेळाव्याचे नियोजन व व्यवस्थाप उच्च दर्जाचे असल्याची पावती नागरिकांकडून दिली गेली. गोपालकांचा बक्षीस देवून सन्मान व सत्कार केला गोला. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या गोपालकांमध्ये ० ते ६ महिने संकरित वासरे छत्रपती कुथे रोहणा, रोहीत पोटफोडे रोहणा, सदानंद भोयर मुंढरी. संकरित गाय - हौशिलाल पोटफोडे रोहणा, निलेश कुथे रोहणा, विजय तुमसरे करडी. संकरीत नर - राजेश बोंदरे रोहणा, प्रविण बारई कांद्री, सुमित डाकरे करडी. म्हेश मादी - जितू अतकरी बोरगांव, बिसन मोहतुरे निलज खुर्द, विजय तुमसरे करडी. म्हैश नर - भगवान तितिरमारे करडी, बिसन मोहतुरे निलज खुर्द, दयाराम राऊत बोरी. बैलजोडी - सुरेश ठवकर करडी, संदिप बडगे पांजरा, निशिकांत इलमे करडी. शेळी - सुखदेव कनपटे निलज बु., नेतराम फाये करडी. बोकड - रोहित बांते मोहगाव, अनवर मोहतुरे पारडी. कोंबड्या नर-मादी - रमेश ठवकर करडी, सहसराम मोहतुरे रोहणा, विक्की नागफासे कांद्री यांचा समावेश आहे. प्रस्तावना महेंद्र शेंडे यांनी केले. संचालन व आभार डॉ. शांताराम चाफले यांनी मानले. (वार्ताहर)
बेरोजगारांनो, शेती व जोडधंद्यातून प्रगती साधा
By admin | Updated: January 20, 2015 00:01 IST