शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी दूर करण्यासाठी नोकरी हक्क कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:01 IST

देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांनी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : मागणी दिनानिमित्त एकवटले बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांनी केली.९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता राणा भवन भंडारा येथे क्रांतीदिनाच्या पर्वावर आॅल इंडिया स्टूडंट्स फेडरेशन एआयएसएफ व आॅल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने बनेगा नावाचा कायदा करा व इतर रोजगार आणि शैक्षणिक समस्यांच्या समाधानासाठी ‘मागणी दिन’ पाळण्यात आला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एआयएसएफचे अध्यक्ष प्रितेश धारगावे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवराज उके, पंकज गजभिये, क्रांती उके व भाऊराव गिºहेपुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी क्रांती उके यांनी युवक गीत सादर केला. मेळाव्यात युवक- विद्यार्थ्यांच्या मागण्यां विषयी बोलत असतांना क्रांतीदिनासंबंधीचा इतिहास, जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडांच्या उलगुलानची माहिती तसेच हिरोसीमा नागासाकीवर अमेरिकन साम्राज्यवाद्यानी केलेला बॉम्ब हल्ला आदीदी विषयीची माहिती हिवराज उके यांनी दिली.त्यानंतर दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणी दिनानिमित्त निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच १३ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले. त्यात सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींना ३६५ दिवसाच्या रोजगाराची हमी देणारा भगतसिंग नॅशनल एम्प्लायमेंट गॅरंटी अ‍ॅक्ट या नावाने कायदा करुन सरकारने त्याची काटेकोर अमंलबजावणी करावी. शिवाय रोजगार (नोकरी) मिळेपर्यंत वर्क वेटिंग अलाऊंसच्या रुपात सातव्या वेतन आयोगाच्या किमान समान वेतन इतकी आर्थिक मदत बेरोजगारास मिळावी अशा १३ मागण्यांचा समावेश आहे.मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना देण्यात आले. केंद्र सरकार तसेच राज्य शासनाला पाठपुरावा करण्याचे सांगितले. शिष्टमंडळात हिवराज उके, एआयएसएफचे अध्यक्ष प्रितेश धारगावे, सचिव भाऊराव गिऱ्हेपुंजे, रवि तिघरे, पंकज गजभिये, उपाध्यक्ष क्रांती उके, गंगाधर फाये, शाहिल मेश्राम, नेहा तिजारे, प्रेरणा गजभिये, अभिलासा मेश्राम, चेतना उके, मिताराम उके, गौतम भोयर आदीचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन भाऊराव गिऱ्हेपुंजे यांनी, तर आभार नेहा तिजारे यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थी