शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:53 IST

आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर्षे झाली आहेत.

ठळक मुद्देदुरुस्तीची गरज । मुख्य कालव्याची लांबी २६ किमी, तुमसर-मोहाडीकरिता वरदान

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर्षे झाली आहेत. मुख्य कालवा दुरुस्तीअभावी पाण्याची नासाडी होऊन शेती पिकांना मोठा धोका येथे निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे.तुमसर तालुक्यातील सितेकसा येथे बावनथडी नदीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या संयुक्त बावनथडी नदीवर बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाची उभारणी ४३ वर्षापुर्वी सुरु करण्यात आली होती. सध्या एकुण १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ होत आहे. केंद्र शासनाच्या योजनेत महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सदर प्रकल्पाचा समावेश आहे. विशेष सन १९७५ मध्ये धरण बांधकामाचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या बावनथडी धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळेच तालुक्यातील नागरिकांची तृष्णा भागविणे सुरु आहे. तुमसर व मोहाडी तालुक्याकरिता सदर प्रकल्प वरदान ठरला आहे. तुमसर तालुका व मोहाडी तालुक्यातील ७७ गावांना सिंचनाचा लाभ मिळत आहे.बावनथडी प्रकल्पाचा मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. धरण बांधकामादरम्यान मुख्य कालवा बांधकाम व त्याचे अस्तरीकरण करण्यात आले होते. सदर कामांना सुमारे २० ते २२ वर्षांचा काळ लोटला. मुख्य कालव्यातून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होतो. मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय व धोक्याची शक्यता अधिक आहे. मुख्य कालव्यातुन लहान कालवे व वितरिकेद्वारे पाणी सिंचनाकरिता देण्यात येते. सध्या प्रकल्पाची किंमत ८६७.२० कोटी एवढी झाली आहे.प्रकल्पाची देखभाल आवश्यकफुटलेल्या मुख्य कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देऊन दुरुस्तीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्याही धरणाचे आयुष्य हे शंभर वर्षाचे असते. धरणात दरवर्षी गाळ साचते. त्यामुळे धरण हळूहळू भरते असे शास्त्रीय कारण असल्याची माहिती आहे. याधरणावर कोट्यवधींचा खर्च आतापर्यंत करण्यात आला..

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प