शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: April 12, 2015 01:04 IST

गर्भपातादरम्यान सोनी येथील मूळ रहिवाशी यशोधरा बांगडकर या तरुणीचा मृत्यू झाला होता.

भंडारा : गर्भपातादरम्यान सोनी येथील मूळ रहिवाशी यशोधरा बांगडकर या तरुणीचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह वैनगंगा नदीत फेकून दिला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी सुमित लंजे (२२) रा. सेंदूरवाफा याला न्यायालयाने सात दिवसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात गर्भपात करणारा डॉक्टर अद्याप फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.कारधा पोलिसांनी शनिवारला सुमित लंजेला भंडारा न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणातील अन्य आरोपींना उद्या रविवारला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या तरुणीचा गर्भपात गिरोला येथील डॉ.दास याने केला होता. घटना उघडकीस आल्यानंतर तो फरार झाला. आज घटनेच्या तिसऱ्या दिवशीही तो फरात असून पोलीस त्याच्या मागावर आहे. त्याच्या शोधासाठी कारधा पोलिसांनी तीन पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना केले आहे. पोलिसांनी यापूर्वीच मुख्य आरोपी सुमित लंजे याच्यासह सुमितच्या घरी ट्रॅक्टरवर काम करणारा महेश कापगते आणि दाईनचा मुलगा ओमप्रकाश ईलमकर, दाईन बायाबाई ईलमकर व वाहनचालक पिंटू बोरकर अशा पाच आरोपींना अटक केली होती. याशिवाय मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.या प्रकरणाचा तपास साकोली पोलिसांना सोपविण्याची कार्यवाही सुरू होती. परंतु आता हा तपास कारधा पोलिसांकडे देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. याप्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आता पुरावा नष्ट करणे या भादंवि २०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)