शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

महर्षीचा यश जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:50 IST

केंद्रीय बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी घोषीत झाला. यात भंडारा तालुक्यातील फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर शाळेचा यश विकास कुंभारे याने ९८.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. जिल्ह्याचा निकाल ९५ टक्के लागल्याची प्राथमिक माहिती असून एकूण ९३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९५ टक्के : यंदाही मुलींचीच भरारी, ९३० विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्रीय बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी घोषीत झाला. यात भंडारा तालुक्यातील फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर शाळेचा यश विकास कुंभारे याने ९८.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. जिल्ह्याचा निकाल ९५ टक्के लागल्याची प्राथमिक माहिती असून एकूण ९३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनी निकालात सरशी घेतली आहे. जिल्ह्यात सीबीएसईच्या डझनभर शाळा असून या शाळांचा निकाल उत्तम लागला आहे.फुलमोगरा येथील महर्षी विद्या मंदिर शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून या शाळेतून २३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात यश विकास कुंभारे हा जिल्ह्यातून प्रथम तर रँकिंगच्या आधारावर देशातून चवथ्या क्रमांकावर असल्याचे प्राचार्य श्रृती ओहळे यांनी सांगितले. शाळेतून द्वितीय क्रमांक पुरू झिंगरे याने प्राप्त केला आहे. त्याला ९७.६० टक्के गुण मिळाले आहेत. तृतीय क्रमांकावर ओम गभने, कृणाल भुरे व चैतन्य गावंडे यांना समाधान मानावे लागेल. तिघांनाही ९६.६० टक्के गुण मिळाले आहे. ९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५७ इतकी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्रृती ओहळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व पालकांनी कौतुक केले आहे.तुमसर येथील महर्षी विद्या मंदिर शाळेतून ११२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. येथेही शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतून करण घरडे याने ९६.२० टक्के गुण घेवून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे.तुमसर येथील शिरीनभाई नेत्रावाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. शाळेतून शैली भगत या विद्यार्थीनीने ९६.८० टक्के गुण घेवून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. तृतीय क्रमांक स्रेहल पोपटानी (९६ टक्के) तर तृतीय क्रमांक श्रेयश हटकर (९५.८० टक्के) याने प्राप्त केला.जवाहरनगर येथील केंद्रीय विद्यालयातून एकूण ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९७ टक्के गुण मिळवून दिशा शेंडे ही शाळेतून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक निधी तिरपुडे (९६.६ टक्के) व तृतीय क्रमांक साक्षी शर्मा (९४.६ टक्के) हिने प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य अनिल घोलपे व शिक्षकांनी कौतुक केले आहे. भंडारा येथील सनीज स्प्रिंग डेल शाळेतून श्रेया निखाडे हिने ९७.६० टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक वैष्णवी पडोळे (९७.२० टक्के) तर तृतीय क्रमांक निकीता कटरे (९७ टक्के) हिने प्राप्त केला आहे.भंडारा येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी यश मिलिंद बोंगीरवार याने ९४.४० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आला आहे. तो आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक जगदाळे, शिक्षकवृंद व आई-वडीलांना दिले आहे.भंडारा येथील सेंट पिटर्स शाळेतून श्रेयस राजकुमार मौर्य याने ९२.८ टक्के गुण मिळवून यश मिळविले आहे ते आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शाळेच्या मुख्याध्यापक व गुरूजनांना दिले आहे. भंडारा येथील सेंट मेरीस शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे. याशळेतील सर्वच विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. वरठी स्थित सनफ्लॅग शाळेची विद्यार्थीनी प्रेरणा शंकर राठोड हिने ९५.८० टक्के गुण घेवून शाळेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रेरणाने भारतीय प्रशासनिक सेवेत कॅरियर घडविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.यशला जायचंय वैद्यकीय क्षेत्रातजिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेत आलेला महर्षी विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी यश कुंभारे याला वैद्यकीय क्षेत्रात करिंअर घडवायचे आहे. जीवशास्त्र या विषयात त्याची प्रचंड आवड असून विज्ञान शाखेत प्रवेश करून भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. यशचे वडील विकास कुंभारे हे कृषी विकास अधिकारी असून आई वैशाली या गृहीणी आहेत. यशचा लहान भाऊआठव्या वर्गात शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे यशला विज्ञान, संस्कृत या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहे. तर गणित विषयात ९९ गुण मिळाले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक व आई-वडिलांना देतो.