शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला द्यायचा पाठिंबा? कार्यकर्त्यांकडून मतदान, भंडाऱ्यातील माजी आमदाराचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 09:44 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराची पाठराखण करायची याचा निर्णय घेण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी जन विकास फाउंडेशनमधील आपल्या कार्यकर्त्यांचे चक्क मतदान घेतले.

 भंडारा - लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराची पाठराखण करायची याचा निर्णय घेण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी जन विकास फाउंडेशनमधील आपल्या कार्यकर्त्यांचे चक्क मतदान घेतले. या मतदानाची मोजणी १० एप्रिलला करून त्यानंतर निवडणुकीत काय भूमिका घ्यायची हे ते जाहीर करणार आहेत. 

वाघमारे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ऐनवेळी डॉ. प्रशांत पडोळे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पुढील काही दिवस कोणत्याही पक्षांच्या मंचावर जाणार नाही, रॅलीत अथवा प्रचाराला जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. आपल्या जन विकास फाउंडेशनमधील कार्यकर्त्यांनाही त्यांनी हे आवाहन केले होते.

परंतु, लोकसभा निवडणुकीत स्वस्थ बसण्याऐवजी आपली राजकीय भूमिका घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांकडून सातत्याने  विचारणा होत असल्याने त्यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर कोणत्या पक्षाला सहकार्य करायचे याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडून मतदान करून घेण्यात आले. 

मतदानावर काेअर कमिटी घेणार निर्णय - जनविकास फाउंडेशनमधील २० प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक कोअर कमिटी वाघमारे यांनी तयार केली आहे. - कार्यकर्त्यांच्या मतदानाच्या निकालावर व त्यांच्याकडून आलेल्या कौलावर विचार करून १० तारखेला फाउंडेशनची पुढील भूमिका जाहीर केली जाणार आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४