शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

Maharashtra Election 2019 ; १२५ मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ हजार २६६ टपाली मतपत्रिकाबाबत माहिती उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज । शक्तिप्रदर्शनानंतर मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सोमवारला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून भंडारा जिल्ह्यातील तीन्ही विधानसभा मतदारसंघांतर्गत १२५ मतदान केंद्रांवर वेब कॉस्टींग करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन मतदान तथा मतमोजणीसाठी पूर्ण तयारी केली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ हजार २६६ टपाली मतपत्रिकाबाबत माहिती उपलब्ध झाली आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रांतर्गत एकुण ३५६ मतदान केंद्र असून शहर विभागात २५ तर ग्रामीण क्षेत्रात २२० केंद्र उभारण्यात आले आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात ४५६ मतदान केंद्र असून त्यापैकी ५० शहरी भागात तर उर्वरीत २५५ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रांतर्गत ३९४ मतदान केंद्र असून २५ शहरी भागात तर ७४३ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत.जिल्ह्यात ५ हजार २७० दिव्यांग मतदारतीन्ही विधानसभा क्षेत्रांतर्गत पाच हजार २७० दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली असून ते आपल्या अधिकाराचा हक्क बजावणार आहेत. तुमसर मतदार संघात १२८१, भंडारा १४६३ तर साकोली विधानसभा क्षेत्रात २५२६ दिव्यांग मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी जिल्ह्यात ९८२ अपंग मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून त्याअंतर्गत ५५४ तीन चाकी (व्हीलचेअर) ची सुविधा असणार आहे.जिल्हा निवडणूक विभागाने तीन्ही विधानसभा अंतर्गत जिल्ह्यातील १९ मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटीकल) असल्याचे घोषीत केले आहे .त्यात तुमसर मतदारसंघात तीन, भंडारा नऊ तर साकोली क्षेत्रातील सात मतदान केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय तुमसर तालुक्यात दोन, भंडारा तालुक्यात दोन तर साकोली मतदारसंघात तीन सखी मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय एवढ्याच संख्येने त्या मतदारसंघामध्ये आदर्श मतदानकेंद्र स्थापित केले जाणार आहे. याची संख्याही सात आहे. वेब कॉस्टींग अंतर्गत तुमसर तालुक्यातील ३५, भंडारा मतदार संघात ५० तर साकोली विधानसभा क्षेत्रातील ४० मतदान केंद्रात वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे.निवडणूक विभागाने तीनही विधानसभा क्षेत्रांतर्गत मतदान केंद्राध्यक्ष म्हणून १२०६ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात क्षेत्रीय अधिकाºयांची संख्या १०८ असून त्यात राखीव क्षेत्रीय अधिकारी म्हणून १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रथम मतदान अधिकारी म्हणून १२०६ तर इतर मतदान अधिकारी म्हणून २४१२ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ३७८ अधिकारी राखीव राहणार आहेत. याशिवाय फिरते पथक १२, स्थिर पथक १२ तर अकरा व्हीडीओ निरीक्षण पथक निर्माण करण्यात आले असून सोमवारी मतदानाच्या दिवशी यांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे.तुमसर येथील आयटीआय इमारतमध्ये २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भंडारा येथील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात तर साकोली येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन्ही विधानसभा क्षेत्रांतर्गत एकुण ५४ टेबल राहणार आहेत.मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात एकुण २३७५ पोलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची तैनाती राहणार आहे. यात एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, ६५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १२२६ पोलीस हवालदार, ७५६ होमगार्डचे जवान तर बीएसएफची एक तर राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.तीनही मतदार संघात मतदान कर्मचाऱ्यांसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्था ही आखली आहे. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या १२२ बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यात तुमसर मतदार संघात ३९, भंडारा ३० तर साकोली मतदारसंघात ५३ एसटी बसेस सेवेत दाखल होणार आहेत. याशिवाय भंडारा मतदारसंघात २५ स्कूल बसेस, तुमसर मतदारसंघात १४ शासकीय जीप, भंडारा मतदारसंघात ३५ तर साकोली क्षेत्रात १४ जीप उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय खासगी जीप म्हणून तुमसर क्षेत्रात ६१, भंडारा ५७ तर साकोली क्षेत्रात ५६ जीपची व्यवस्था करून देण्यात आली आहे. याशिवाय साहित्य वहन करण्यासाठी सात ट्रक उपलब्ध राहणार आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडाराEVM Machineएव्हीएम मशीन