शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

Maharashtra Election 2019 ; मतदान केंद्रावर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:00 AM

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ९८२ मतदान केंद्रावर ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांसाठी रॅम्प, ५२४ व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, मदत कक्ष व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुमसर मतदारसंघात १२७४, भंडारा १४०२, साकोली २०६८ दिव्यांग मतदार आहेत. यासाठी जिल्हा व विधानसभा क्षेत्र स्तरावर दिव्यांग नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यात ५२६६ दिव्यांग मतदार : पीडब्लूडी अ‍ॅपचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना सन्मानपूर्वक मतदान करता यावे यासाठी प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्यात ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांनी पीडब्लूडी अ‍ॅपचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ९८२ मतदान केंद्रावर ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांसाठी रॅम्प, ५२४ व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, मदत कक्ष व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुमसर मतदारसंघात १२७४, भंडारा १४०२, साकोली २०६८ दिव्यांग मतदार आहेत. यासाठी जिल्हा व विधानसभा क्षेत्र स्तरावर दिव्यांग नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मतदान प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींनी सहभागी व्हावे यासाठी त्यांना मोबाईलद्वारे एसएमएस पाठविण्यात येत आहेत. १९५० या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा दिव्यांग व्यक्तींना माहिती उपलब्ध होणार आहे.भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी पीडब्लूडी अ‍ॅप तयार केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी करू शकतो. तसेच अ‍ॅपवर मतदान केंद्र शोधणे, तक्रार नोंदविणे, व्हीलचेअरची मागणी करणे, केलेल्या तक्रारींची सूची आणि माहिती उपलब्ध राहणार आहे. मतदान प्रक्रियेबद्दल बेल स्क्रीप्ट मधील वोटर स्लीप देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. डमी ब्रेल बॅलेट कागदांची उपलब्धतता करण्यात आली आहे.दिव्यांगांना मतदानासाठी रांगेचे बंधन नाहीदिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर रांग लावण्याची आवश्यकता नाही. त्यांना प्रथम प्राधान्याने मतदान करू दिले जाणार आहे. दिव्यांगांना सुविधांची माहिती व्हावी यासाठी शिक्षक व विषयतज्ज्ञांच्या ७३ मतदान चमूच्या मदतीने ६९३ शाळा गावागावांत घेण्यात आल्या. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मतदान केंद्राधिकाºयांना प्रती दिव्यांग मतदार ४० रुपये देण्यात येणार आहे. यासोबतच दिव्यांगांच्या मदतीसाठी आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मदतनिस म्हणून नेमणूक करण्यात येणार आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडारा