शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Maharashtra Election 2019 ; तीन मतदारसंघात २४ उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST

साकोलीचे विद्यमान भाजप आमदार बाळा काशिवार यांची तिकीट पक्षाने कापली असून तेथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी भाजपने तिसरी यादी घोषित केली. त्यात जिल्ह्यातील केवळ साकोली विधानसभेची उमेदवारी घोषित झाली असून तुमसर येथील उमेदवाराचा नावाचा संभ्रम कायम होता.

ठळक मुद्देआज अंतिम तारीख : तुमसरच्या उमेदवारीचा संभ्रम कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तीन मतदारसंघात गुरवारपर्यंत २४ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले असून उद्या शुक्रवार हा नामांकनाची अंतिम तारीख आहे. प्रमुख उमेदवार शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल करणार आहेत. भाजपने साकोली विधानसभेसाठी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या नावाची घोषणा केली असून तुमसरच्या उमेदवारीचा मात्र संभ्रम कायम होता.विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन तीनही मतदार संघात प्रचंड घमासान सुरु आहे. शेवटचा दिवस आला तरी बहुतांश ठिकाणी उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळेच पहिल्या चार दिवसात नामांकन दाखल करणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत २४ उमेदवारांनी ३८ नामांकन दाखल केले आहे. तुमसर मतदारसंघात सहा नामांकन दाखल झाले आहे. त्यात अपक्ष के. के. पंचबुद्धे, सदाशिव शिवा ढेंगे, भोलाराम मानिक परशुरामकर तर अपक्ष आणि भाजपकडून चरण वाघमारे यांच्यासह अपक्ष व राष्ट्रवादी तर्फे राजकुमार माटे तर बहुजन मुक्तीपार्टीकडून रविदास श्रावण लोखंडे यांनी नामांकन दाखल केले आहे.भंडारा विधानसभा क्षेत्रात चवथ्या दिवशी नामांकनाचा श्रीगणेशा झाला. तीन दिवस एकही नामांकन दाखल झाले नव्हते. आठ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जयदिप जोगेंद्र कवाडे, अपक्ष प्रशांत बालक रामटेके, नितीन सूर्यभान बागडे, अजय प्रेमदास रंगारी, सदानंदा जागोजी कोचे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नितीन मनोज बोरकर, भाकपतर्फे हिवराज भिकुलाल उके आणि लोकराज पार्टीतर्फे सुरेश मारोती भवसागर यांनी नामांकन दाखल केले.साकोली विधानसभा क्षेत्रात दहा नामांकन दाखल झाले असून त्यात भाजपतर्फे डॉ. परिणय फुके आणि अपक्ष व भाजपतर्फे राजेश काशीवार, अपक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष म्हणून प्रकाश हरिचंद्र देशकर, अण्णा श्रीराम फटे यांच्यासह बळीराजा पार्टीच्या उर्मिला प्रशांत आगाशे, वंचित बहुजन आघाडी चंद्रशेखर शामराव टेंभुर्णे, अपक्ष सुभाष रामचंद्र बावनकुळे, सुहास फुंडे, अतुल परशुरामकर यांनी नामांकन दाखल केले आहे.तीनही मतदारसंघात शुक्रवारी नामांकन दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे. तसेच शक्ती प्रदर्शनही केले जाणार आहे.साकोलीच्या भाजप आमदाराचे तिकीट कापलेसाकोलीचे विद्यमान भाजप आमदार बाळा काशिवार यांची तिकीट पक्षाने कापली असून तेथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी भाजपने तिसरी यादी घोषित केली. त्यात जिल्ह्यातील केवळ साकोली विधानसभेची उमेदवारी घोषित झाली असून तुमसर येथील उमेदवाराचा नावाचा संभ्रम कायम होता.अधिकृत उमेदवारांच्या नावांच्या घोषणेची प्रतीक्षामहायुतीत भंडारा विधानसभा रिपाइंच्या आठवले गटाला तर आघाडी पिरिपाच्या कवाडे गटाला देण्यात आला आहे. अद्यापपर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली नसली तरी महायुतीतर्फे जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर आघाडीतर्फे जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी गुरुवारी नामांकन दाखल केले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून नामांकन दाखल करणार आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघात युती आणि आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा गुरुवारी सायंकाळपर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र आघाडीतर्फे राजु कारेमोरे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. युतीच्या उमेदवार वेळेवर निश्चित होईल असे सांगितले जात आहे.

टॅग्स :tumsar-acतुमसर