शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

Maharashtra Election 2019 ; नेते फॉर्मात, कार्यकर्ते सावध भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:01 IST

स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत आहे.

ठळक मुद्देकार्यकर्ते झाले हुशार : कोण कुणाचा, थांगपत्ता लागेना

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. तुमसर मतदारसंघात उमेदवार व नेते फार्मात दिसत असून कार्यकर्त्यांची भूमिका सावध दिसत आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी व भाजप - सेना व अपक्षांचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. कोण कार्यकर्ता कुणाचा आहे याची संभ्रमावस्था आहे. एकामेकांकडे शंकेने बघितले जात आहे. आपले काय अमूक करीत आहे काय? प्रामाणिक साथ देईल काय? या चिंतेने सध्या उमेदवारांना ग्रासले आहे.राजकारणात काहीही होऊ शकते, यात कायम कुणी मित्र व शत्रू राहत नाही. दोन भीन्न तत्व प्रणालीचे पक्ष व त्यांचे नेते पक्षाचा त्याग करून प्रवेश करीत आहेत. जे पक्षात होते ते बाहेर पडले आहेत. मात्र कार्यकर्ता येथे भरडला जात आहे. काय करावे असा विचार करीत आहे. आमचे प्रेम अमक्यावर आहे तर मी त्यांचा काम करेन, परंतु प्रेमाला राजकारणात स्थान नाही. येथे परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो असे बाळकडू दुसरे पाजत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत आहे.बड्या नेत्यांचा उद्या प्रवेशतुमसर मतदारसंघातील मोठे नेत्यांचा उद्या अधिकृत भाजपमध्ये प्रवेश होत असल्याची माहिती आहे. येथे राजकारण ढवळून निघाले आहे. पुन्हा दोन दिवसात इतरांचे प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.नेत्यांची फिल्डींगतुमसर मतदार संघात राजकीय पक्ष नेत्यांनी मोठी फिल्डींग लावली आाहे. अटीतटीची निवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे रिस्क नको म्हणून वरिष्ठ नेत्यांनी दुसऱ्या नेत्यांची येथे नेमणूक केली आहे. वरिष्ठ नेते येथे संध्याकाळी, रात्री दररोजची माहिती नेमणूक केलेल्या नेत्यांकडून घेत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडारा