शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

Maharashtra Election 2019 ; इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेले चार मतदान केंद्र ‘शॅडो झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 6:00 AM

भंडारा मतदारसंघातील नवेगाव (कोका), चंद्रपूर, सर्पेवाडा आणि दुधाळा मतदान केंद्र जंगलव्याप्त परिसरात तेथे इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे प्रशासनाने या केंद्रांना शॅडो झोनचा दर्जा दिला आहे. डाटा फीडिंग करताना अडचण निर्माण होणार असल्याने येथे पोलीसच्या वायरलेस प्रणालीचा उपयोग करुन डाटा फीडिंग केली जाणार आहे.

ठळक मुद्देडाटा फीडिंगसाठी पोलीस वायरलेसची मदत : भंडारातील नवेगाव, चंद्रपूर, सर्पेवाडा व दुधाळा केंद्राचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेले भंडारा विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्र शॅडो झोनमध्ये आहेत. येथे डाटा फीडिंगसाठी पोलिसांच्या वायरलेसची मदत घेतली जाणार आहे.भंडारा मतदारसंघातील नवेगाव (कोका), चंद्रपूर, सर्पेवाडा आणि दुधाळा मतदान केंद्र जंगलव्याप्त परिसरात तेथे इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे प्रशासनाने या केंद्रांना शॅडो झोनचा दर्जा दिला आहे. डाटा फीडिंग करताना अडचण निर्माण होणार असल्याने येथे पोलीसच्या वायरलेस प्रणालीचा उपयोग करुन डाटा फीडिंग केली जाणार आहे. मतदानात कोणतीही अडचण येवू नये यासाठी प्रशासन पुर्ण सज्ज झाले आहे.भंडारा जिल्ह्यात १९ क्रिटीकल मतदान केंद्र असून या सर्व केंद्रावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. तर प्रत्येकी सात सखी आणि आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. सखी मतदान केंद्रावर सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील १२५ मतदान केंद्रावरुन वेबकास्टींग (थेट चित्रीकरण) केले जाईल. जिल्ह्यातील निवडणुका पारदर्शक पध्दतीने व निर्भिडपणे होण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यात ५२७० दिव्यांग मतदार आहेत. त्यात तुमसर १२८१, भंडारा १४६३, साकोली २५२६ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. मतदान करणे सोईचे व्हावे यासाठी ५५४ व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून ९८२ दिव्यांग मित्र याठिकाणी मदतीला राहणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी बीएलओकडून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.मतदारांसाठी सी-व्हिजेल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून आतापर्यंत प्रशासनाला या माध्यमातून सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रार निवारणासाठी मदत केंद्र सुरु करण्यात आले असून मतदारांना १९५० या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे. रविवारी जिल्ह्यातील १२०६ मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या. यासाठी १२२ एसटी बस, १२ स्कूल बसची मदत घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी ३९१ वाहनांचा वापर केला जाणार असून त्यात शासकीय व खाजगी जीपचा समावेश आह.े 

टॅग्स :bhandara-acभंडारा