शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Election 2019 ; विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम नाही. ...

ठळक मुद्देशत्रुघ्न सिन्हा : साकोली येथे नाना पटोलेंच्या प्रचारार्थ सभा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम नाही. विकासाच्या नावावर देशात सर्वत्र अनागोंदी सुरु असून विद्यमान सरकार नावापुरतेच उरले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी येथे केले.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे साकोली मतदारसंघाचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ गुरुवारी साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंडवर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी सभापती पद्माकर गहाणे, सभापती रेखा वासनिक, माजी सभापती मदन रामटेके, पंचायत समिती सदस्य छाया पटले आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना शत्रूघ्न सिन्हा म्हणाले, विद्यमान सरकारपुढे कोणतीही समस्या सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून केवळ ३७० कलम हटविल्याचे सांगतात आणि समस्यांकडे दुर्लक्ष करतात. केंद्र सरकार शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहेत. देशात ७० टक्के लोक शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मुठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. महाराष्ट्रात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. परंतु त्याविषयी उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही. शेतकरी शेतमजुरांच्या समस्यांवर काहीच बोलत नाही. प्रत्येक प्रश्नाला सर्जीकल स्ट्राईक, बाला कोट, ३७० कलम हेच उत्तर देतात, असे शत्रूघ्न सिन्हा म्हणाले.काँग्रेसने देशाला विचार दिला. विकासाची दिशा दाखविली. देशाची प्रगती करायची असल्यास काँग्रेसशिवाय पर्याय नाही. मात्र आता देशात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू आहे. सरकारविरूद्ध कुणी बोलले की त्याचा आवाज दाबण्यासाठी विविध चौकशांच्या ससेमिरा लावला जातो, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. काँगे्रसला लोकांचे जीवनमान सुधारावयाचे आहे. त्यासाठी नवनवीन कारखाने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे. हे सर्व काँग्रेसच करू शकते, असे ते म्हणाले.यावेळी आनंद नंदागवळी, ओम गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य हेमराज कापगते, बाळू बावनकुळे, अंगराज समरीत, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, अशोक कापगते आदी उपस्थित होते. संचालन अश्विन नशिने यांनी तर आभार संदीप बावनकुळे यांनी मानले.

टॅग्स :sakoli-acसाकोलीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा