लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत पाच वर्षात भाजप-शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. बेरोजगारी वाढली आहे. केवळ खोटी आश्वासने दिली जात आहे. अशा सरकारला धडा शिकवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तुमसर विधानसभेचे उमेदवार राजू कारेमारे यांच्या प्रचारार्थ तुमसर तालुक्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मांडेसर, धोप, बघेडा, आष्टी, सिहोरा, देव्हाडी येथे खासदार प्रफुल्ल पटेलांनी सभा घेतली. यावेळी उमेदवार राजू कारेमोरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, रमेश पारधी यांनीही सभेला संबोधित केले. राज्याची आर्थिक स्थिती वाईट आहे. नोकर भरती बंद आहे. सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा सरकारला धडा शिकविण्याची वेळ आल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले. यावेळी वासुदेव बांते, सीमा भुरे, प्रमोद तितीरमारे, राजू माटे, माधव बांते, श्रीकृष्ण पडोळे, देवचंद ठाकरे, देवीदास लांजेवार, कमलेश कनोजे, प्रदीप बुराडे, सदाशिव ढेंगे, राजेश हटवार, अनिल काळे, बालचंद दमाहे, विणा झंझाड, बंडू पशिने, प्रविण सवालाखे, प्रकाश नागपूरे आदी उपस्थित होते.मोहाडी येथे माता चौंडेश्वरी मंदिरात विधीवत पुजा करुन प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, पिरिपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वखर्चातून मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारणार- राजू कारेमोरेतुमसर आणि मोहाडी तालुक्यात आरोग्य सेवा कमकुवत आहे. गत पाच वर्षात आरोग्य सुविधेकडे मोठे दुर्लक्ष झाले. आपण स्वखर्चातून मतदारसंघात मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारणार असल्याची ग्वाही काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजू कारेमोरे यांनी तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे दिली. दोनही तालुक्यातील तरुणांना नोकºया नसल्याने तरुण बेरोजगार आहेत. उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच महिलांचा सन्मान केला जाईल. आपण सर्वांना समान न्याय मिळेल. अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
Maharashtra Election 2019 ; भाजप-सेना सरकारने जनतेची दिशाभूल केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तुमसर विधानसभेचे उमेदवार राजू कारेमारे यांच्या प्रचारार्थ तुमसर तालुक्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मांडेसर, धोप, बघेडा, आष्टी, सिहोरा, देव्हाडी येथे खासदार प्रफुल्ल पटेलांनी सभा घेतली. यावेळी उमेदवार राजू कारेमोरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, रमेश पारधी यांनीही सभेला संबोधित केले.
Maharashtra Election 2019 ; भाजप-सेना सरकारने जनतेची दिशाभूल केली
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजू कारेमोरे यांची प्रचार सभा