शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; स्वपक्षीयांचे बंड मोडण्याचे पक्षश्रेष्ठींपुढे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भंडारात बंडखोरी केली आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नामांकन दाखल केले. आघाडीतही धुसफूस दिसत असून काँग्रेसच्या वाट्याची तुमसरची जागा राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेसचे डॉक्टर पंकज कारेमोरे यांनी उमेदवारी दाखल केली. यासोबतच राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बावनकर आणि शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनीही नामांकन दाखल केले आहे.

ठळक मुद्देयुती -आघाडीत पेच प्रसंग । आजी-माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन वेळेवर तिकीट कापल्याने आणि पक्षश्रेष्ठींनी शब्द देऊनही उमेदवारी नाकारल्याने जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. आता त्यांचे बंड कसे मोडून काढायचे यासाठी पक्षश्रेष्ठी व्यूहरचना आखत असून सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे. तर बंडखोर कोणती भूमिका घेतात याकडे तुमसर आणि भंडारा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भाजपने तीनही विद्यमान आमदारांचे तिकीट कापून मोठा धक्का दिला. यापैकी तुमसर आणि भंडाराच्या आमदारांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांचे नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तिकीट कापले. आपले तिकीट कापले जाईल याचा काही दिवसांपासून अंदाज त्यांना आला होता. त्यामुळेच त्यांनी नामांकनाची तयारी चालविली होती. नामांकन दाखल करताना त्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनातून याचा अंदाज येतो. आता त्यांचे बंड कसे थंड करयाचे हा प्रश्न पक्षश्रेष्ठीपुढे आहे. भजप उमेदवारांचा मार्ग सुकर करण्यासाठी त्यांची उमेदवारी मागे घेण्यसाठी प्रयत्न केले जाणार आहे. आता त्यांची समजूत कशी काढली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भंडाराचे भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनाही तिकीट नाकारण्यात आले. येथील जागा महायुतीच्या आठवले गटाला गेली, परंतु पाच वर्षे सत्तेत असलेल्या आमदार अवसरे यांनी नामांकन दाखल करून बंडखोरी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र त्यांनी सावध पवित्रा घेत कार्यकर्त्यांचा विचार घेऊन उमेदवारीचा निर्णय घेणार असल्याचे सांगत आहेत. साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांचीही तिकीट कापण्यात आली. त्यांनीही उमेदवारी दाखल केली. दरम्यान छाननीत त्यांचे नामांकन एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरले. यामुळे येथील मार्ग भाजपसाठी मोकळा झाला आहे. काशीवार नामांकन दाखल करण्यापासून भाजप उमेदवार डॉ.परिणय फुके यांच्यासोबत आहेत.युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भंडारात बंडखोरी केली आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नामांकन दाखल केले. आघाडीतही धुसफूस दिसत असून काँग्रेसच्या वाट्याची तुमसरची जागा राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेसचे डॉक्टर पंकज कारेमोरे यांनी उमेदवारी दाखल केली. यासोबतच राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बावनकर आणि शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनीही नामांकन दाखल केले आहे. साकोली मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. युतीतील बंड दोन दिवसात थंड होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातील बंडखोरी कशी मोडून काढली जाणार याकडे लक्ष लागले आहे.तीनही मतदारसंघात तिरंगी लढतीची स्थितीतुमसर, भंडारा आणि साकोली या तीनही मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. तुमसरमध्ये भाजपचे प्रदीप पडोळे, राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांच्या सह अपक्ष आमदार चरण वाघमारे रिंगणात आहेत. वाघमारे यांची उमेदवारी कायम राहिल्यास येथे तिरंगी लढत निश्चित आहे. भंडारा मध्ये महायुतीचे अरविंद भालाधरे आणि आघाडीचे जयदीप कवाडे यांच्यापुढे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आव्हान उभे केले आहे. तेही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. साकोलीमध्ये माजी आमदार सेवक वाघाये यांनी उमेदवारी दाखल केल्याने तीनही मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडारा