शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

Maharashtra Election 2019 : तीनही मतदार संघात तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या शेवटच्या दिवशी २७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर मध्ये भाजप बंडखोर आमदार चरण वाघमारे, भंडारात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर साकोलीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवित आहे.

ठळक मुद्दे२७ उमेदवारांची माघार : तुमसरमध्ये १०, भंडारात १४ आणि साकोलीत १५ उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात बंडखोरानी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने तुमसर, भंडारा आणि साकोली मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या शेवटच्या दिवशी २७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर मध्ये भाजप बंडखोर आमदार चरण वाघमारे, भंडारात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर साकोलीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवित आहे.भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभेसाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले. ६६ उमेदवार कायम होते. यापैकी कोण आपली उमेदवारी मागे घेणार याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सूकता लागली होती. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल २७ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. तुमसर विधानसभा मतदारसंघात पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता तेथे १० उमेदवार रिंगणात आहेत. भंडारा मतदार संघात ११ जणांनी माघार घेतल्याने येथे १४ उमेदवार तर साकोली मतदारसंघात ११ जणांनी मागार घेतल्याने १५ उमेदवार रिंगणात आहेत.नामांकन मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तुमसरमध्ये युतीत बंडखोरी झाली आहे. तिकीट नाकारल्याने आमदार चरण वाघमारे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या भूमिकेवर कायम राहिले. तर राष्टÑवादीचे बंडखोर माजी आमदार अनिल बावनकर आणि योगेश सिंगनजुडे यांनी माघार घेतली. तुमसर मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे आता निश्चित झाले आहे.तिकीट नाकारल्याने भंडाराचे भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र सोमवारी त्यांनी आपले नामांकन मागे घेतले. तर भंडारा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या जागेवर शिवसेनेने सुरुवातीपासून दावा केला होता. मात्र ही जागा युतीच्या मित्र पक्षाला गेली. त्यामुळे भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली. साकोली मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी अगदी वेळेवर वंचित बहूजन आघाडीत प्रवेश करुन आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे येथेही तिरंगी लढतीची शक्यता आहे.भंडारात ११ जणांची माघारभंडारा विधानसभा क्षेत्रातून सोमवारी ११ जणांनी माघार घेतली. त्यात मनसेच्या पूजा गणेश ठवकर, भाकपचे हिवराज उके यांच्यासह अपक्ष अनुसयाबाई बावणे, रामचंद्र अवसरे, गोवर्धन चौबे, चेतक डोंगरे, अ‍ॅड. नितीन बोरकर, नितीन बागडे, विकास राऊत, मुकेश लोखंडे, सुधीर नामदेव रामटेके यांचा समावेश आहे.

साकोलीत ११ जणांची माघारसाकोली विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघार घेणाऱ्यांमध्ये अपक्ष अण्णा फटे, अनिल मेश्राम, अशोक पटले, चंद्रशेखर टेंभुर्णे, दिनेश वासनीक, धीरज गोस्वामी, प्रकाश देशकर, डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, भागवत मस्के, राकेश चोपकर, संजय केवट यांचा समावेश आहे.

तुमसरमध्ये पाच जणांची माघारतुमसर विधानसभा मतदारसंघातून पाच जणांनी माघार घेतली. त्यात माजी आमदार अनिल बावनकर, गौरीशंकर मोटघरे, योगेश सिंगनजुडे, राजकुमार मनिराम माटे, सुरेश हरिश्चंद्र रहांगडाले यांचा समावेश आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा