शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

Maharashtra Election 2019 ; अपक्षांनी घेतली ३०.७५ टक्के मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात २० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. भंडारात आठ, साकोलीत सात आणि तुमसरमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या अपक्षांनी प्रमुख दोन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्षांनी तीन व चार अंकी मते घेतली.

ठळक मुद्देअपक्षाने बाजी मारली : सहा लाख ७१ हजार ८८२ मतांपैकी अपक्षांना २० लाख ६ हजार ६२९ मते

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोणतीही निवडणूक अपक्षांना लढविणे कठीन जाते. मतांची बेरीज शून्यापासून सुरू होते. मात्र भंडारा मतदारसंघात अपक्षाने इतिहास घडवित विजय संपादित केला. तीनही मतदारसंघातील २० अपक्ष उमेदवारांनी मतदानाच्या ३०.७५ टक्के मते घेतली. त्यात तुमसर आणि भंडारा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी अपक्षाच्या वाट्याला दोन लाख ६२९ मते गेली. यामुळे अनेकांचे गणितही बिघडले.भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात २० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. भंडारात आठ, साकोलीत सात आणि तुमसरमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या अपक्षांनी प्रमुख दोन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्षांनी तीन व चार अंकी मते घेतली.भंडारा विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांना मतदारांनी पसंती देत विधानसभेत पाठविले. अपक्ष एवढी मोठी आघाडी मारेल काय, अशी साशंकता सुरूवातीला होती. मात्र नरेंद्र भोंडेकर यांनी संपूर्ण मतदारसंघात आपली पकड निर्माण करत विजय खेचून आणला. भंडारा मतदारसंघात दोन लाख ३१ हजार ७९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी अपक्षांना एक लाख १७ हजार ७९३ मते मिळाली. झालेल्या मतदानाच्या ५०.८१ टक्के मते अपक्षांनी मिळविली. त्यात सर्वाधिक मते नरेंद्र भोंडेकर यांना एक लाख एक हजार ७१७ मते मिळाली. त्याखालोखाल अपक्ष प्रशांत बालक रामटेके यांनी नऊ हजार ८८७ मते घेतली. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारापेक्षाही ही मते अधिक आहेत.तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे यांची थेट लढत अपक्ष आणि भाजप बंडखोर चरण वाघमारे यांच्यासोबत झाली. या अटीतटीच्या लढतीत राजू कारेमोरे यांनी विजय संपादित केला. मात्र या मतदारसंघातही अपक्षांनी घेतलेली मते लक्षणीय आहे. दोन लाख १३ हजार ४१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी ८५ हजार ३७२ मते अपक्षांना मिळाली. त्यात सर्वाधिक ७९ हजार ४९० मते एकट्या चरण वाघमारे यांनी मिळविली. इतर उमेदवार मात्र तीन हजारापेक्षा अधिक मते घेवू शकले नाही. अपक्ष डॉ. पंकज कारेमोरे यांनी तीन हजार १५८ मते घेतली. यंदाच्या निवडणुकीत तुमसर आणि भंडारात अपक्षांचा चांगलाच बोलबाला होता.साकोलीत अपक्षांना केवळ १.५२ टक्के मतेसाकोली विधानसभा मतदारसंघात अपक्षांना मात्र हजारचा आकडाही पार करता आला नाही. येथे १५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सात जणांनी अपक्ष निवडणूक लढली. दोन लाख २६ हजार ५८३ मतांपैकी अपक्षांच्या वाट्याला तीन हजार ४६४ म्हणजे १.५२ टक्के मते मिळाली. येथे सर्वाधिक ७१८ मते सुभाष बावनकुळे या अपक्ष उमेदवाराने मिळविली. 

टॅग्स :bhandara-acभंडारा