शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भागवत कथा सांगायला महाराज गावात आले अन् विवाहितेला घेऊन धूम पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 19:54 IST

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; महाराज आणि पत्नीचा शोध सुरू

भंडारा : कथेच्या माध्यमातून आठवडाभर नैतिकेच्या कथा सांगणाऱ्या महाराजाने सप्ताह आटोपताच चक्क गावातील एका विवाहितेला पळवून नेल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. भंडारानजीकच्या मोहदूरा येथे उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या मदतीने नातेवाईक महाराजाचा शोध घेत आहे.भंडारा लगतच्या मोहदूरा येथे कथा सप्ताह कथाचे आयोजन करण्यात आले होते. कथावाचनासाठी सावनेर तालुक्यातील कुबडा येथील एका महाराजांना आमंत्रित करण्यात आले होते. कथा सप्ताहात महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अशातच त्यांची नजर भागवतातील एका विवाहितेवर गेली. तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधली. महाराजांचे या काळात घरी येणे-जाणे सुरू झाले. एकदाचा कथा सप्ताहाचा समारोप झाला आणि बुधवारी सायंकाळी गावातील एक विवाहिता बेपत्ता झाली.सदर विवाहिता घरी नसल्याची माहिती होताच कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. मात्र थांगपत्ता लागला नाही. अखेर भंडारा पोलीस ठाणे गाठून विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यात कथावाचक महाराजाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी नातेवाईकांना सोबत घेवून कुबडा गाव गाठले. मात्र महाराज गावात पोहचलेच नव्हते. शोधाशोध सुरू असून सदर महाराज वृंदावनला गेल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलीस मोबाईल लोकेशनवरून महाराजाचा शोध घेत आहे.

मोहदूरा येथील एक विवाहिता बेपत्ता असल्याची तक्रार ठाण्यात प्राप्त झाली आहे. सदर तक्रारीत महाराजावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस महाराजांच्या गावापर्यंत जावून आले. परंतु थांगपत्ता लागला नाही. पोलीस पथक महाराजांचा व विवाहितेचा शोध घेत आहे.-सुधाकर चव्हाण, ठाणेदार, भंडारा.