शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशच्या रॉयल्टीवर होतेय भंडारा जिल्ह्यात रेतीचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:53 IST

जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीसह विविध घाटावरील रेती उत्खननासाठी मध्यप्रदेशातील रॉयल्टीचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. याबाबत शिवसेनेच्यावतीने महसूल राज्यमंत्र्यांना निवेदन देवून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहसूल राज्य मंत्र्यांकडे तक्रार : अवैध तस्करीविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीसह विविध घाटावरील रेती उत्खननासाठी मध्यप्रदेशातील रॉयल्टीचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. याबाबत शिवसेनेच्यावतीने महसूल राज्यमंत्र्यांना निवेदन देवून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. रेती उत्खननात तस्कर आणि महसूल अधिकाºयांचे संगणमत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला.भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीतील रेतीला भरपूर मागणी आहे. त्यामुळेच या नदीपात्रातील रेती तस्करीला उधाण आले आहे. अनेकदा महसूलाची रॉयल्टी बूडवून राजरोसपणे रेती तस्करी केली जाते. अलीकडे तर मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातील रेती घाटाच्या रॉयल्टीवर भंडारा जिल्ह्यातील घाटावर रेती उत्खनन केले जात आहे. लाखनी तालुक्यातील नरव्हा, वटेश्वर, मिरेगाव, लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी), साकोली तालुक्यातील लव्हारी, सोमनाळा, कोंदामेंढी, परसोडी (सौंदड), घाटबोरी, तुमसर तालुक्यातील आष्टी, ब्राम्हणी, सोंड्याटोला आणि पवनी तालुक्यातील विविध घाटावर उत्खनन केले जात आहे जिल्ह्यातील २५ हजार ब्राससाठी लिलाव झालेले रेतीघाट संपले. मात्र मध्यप्रदेशातील दोन ते तीन हजार ब्राससाठी लिलाव झालेल्या घाटाची रॉयल्टी कशी आहेत, हा एक प्रश्नच आहे.महसूल विभागातील काही अधिकाºयांना हाताशी धरुन हा प्रकार राजरोस सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे भंडारा जिल्हा उपप्रमुख संजय रेहपाडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि जिल्हा खनीकर्म अधिकाºयांसह जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. या रेतीतस्करांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.मुदत संपली तरी उत्खनन सुरूचविदर्भातील रेतीघाटाचे जून महिन्यातच मुदत संपली आहे. भंडारा जिल्ह्यातील रेती घाटाचीही मुदत संपली आहे. मात्र अद्यापही दररोज हजारो ब्रास रेतीचे उत्खनन केले जात आहे. जेसीबीच्या सहायाने उत्खनन होत आहे. तर पावसाळ्यापूर्वी अनेक तस्करांनी रेतीचा साठा करुन ठेवला असून त्याकडेही महसूलचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

टॅग्स :sandवाळू