शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश पंचायत राज संचालनालय चमूचा अभ्यास दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:13 IST

पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने भंडारा जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू असलेल्या आपले सेवा सरकार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हयातील काही ग्राम पंचायतींना भेट देऊन अभ्यास केला.

ठळक मुद्देआपले सरकार सेवा प्रकल्पाचा अभ्यास : भंडारा जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम पंचायतींना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने भंडारा जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू असलेल्या आपले सेवा सरकार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हयातील काही ग्राम पंचायतींना भेट देऊन अभ्यास केला.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांचे हस्ते अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या पंचायत राज संचालनालयाच्या संचालक उर्मिला शुक्ला व त्यांच्या चमूला ग्रामगिता व टोपी देऊन स्वागत केले. तसेच आपले सरकार सेवा प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती दिली.यावेळी अभ्यास दौऱ्यात प्रभारी संयुक्त तसेच उप महाप्रबंधक एस. के. नेमा, मुख्य कार्यकारी अधिकारी अवि प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कुमार यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत मालवीय, मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पांडे, पंचायत समन्वय अधिकारी एच. एस. शुक्ला, ग्राम पंचायत सचिव आनंद गुप्ता, तर भंडारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, गट विकास अधिकारी नुतन सावंत, विस्तार अधिकारी प्रमोद हुमने, बोरकर, बोदेले, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक निकेशकुमार पटले, पंचायत समिती भंडारा तालुका व्यवस्थापक राकेश ठोंबरे, सीएससी केंद्राचे व्यवस्थापक दुर्गेश भोंगाडे, आशिष चव्हाण, प्रवीण बांडेबुचे आदींची उपस्थिती होती.भंडारा जिल्हयात सन २०१६ मध्ये आपले सरकार सेवा प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेले असून शासनाला आवश्यक असणारी माहिती, नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले आॅनलाईन द्वारे उपलब्ध करून या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजवणी करण्यात येत आहे.नुकत्याच प्राप्त झालेल्या रँकींगमध्ये राज्यात भंडारा जिल्हयाला आपले सरकार सेवा प्रकल्पात तिसºया क्रमांकावर स्थान निर्माण झाले आहे. राज्यात असलेले भंडारा जिल्हयाचे उल्लेखनिय कार्य बघणे व अभ्यास करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारच्या पंचायतराज संचालनालयाच्या वतीने नुकताच भंडारा जिल्हयात अभ्यास दौरा पूर्ण केला. या अभ्यास दौरा चमूचे प्रमूख तसेच पंचायत राज संचालनालयाच्या संचालक उर्मिला शुक्ला व त्यांचे चमूचे रविंद्र जगताप यांनी, सर्वप्रथम ग्रामगिता व टोपी भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर भंडारा जिल्हयात अंमलबजावणी करीत असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर जि टू सी मध्ये ११ अज्ञावली डॉटा एन्ट्रीचे कामे पूर्ण करणे, प्लॅन प्लस, प्रिया सॉप्ट, एरिया प्रोफाईल, एनपीपी, मिटींग मॅनेजमेंट, सोशिअल आॅडिट, रहिवासी दाखला, बिपीएल दाखला, उत्पनाचा दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट, जन्म मृत्यू व १ ते १९ प्रकारचे दाखले ग्रामस्थांना वितरीत करीत असल्याचे सांगितले.ग्रामस्तरावरील आपले सेवा सरकार केंद्राचा अभ्यास व नागरिकांशी संवादभंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या विविध सेवा व केंद्राचा अभ्यास करण्यासाठी भंडारा पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत गणेशपूर, शहापूर तसेच मोहाडी पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत नेरी, बिड सितेपार व पाहूणी आदी ठिकाणी अभ्यास दौरा चमूने भेटी देवून पहाणी व अभ्यास केला. गणेशपूर येथे सरपंच मनिष गणवीर, सचिव श्याम बिलवने, केंद्रचालक विशाखा भिवगडे, शहापूर येथे सरपंच मोरेश्वर गजभिये, सचिव राजू महंत, केंद्रचालक वैशाली भूरे, नेरी येथे गट विकास अधिकारी वंजारी, विस्तार अधिकारी तेलमासरे, सरपंच आनंद मल्केवार, सचिव निरंजना खंडाळकर, तालुका व्यवस्थापक अवि बडवाईक, लेखीराम शेंडे, संजय हजारे, बिडसितेपार येथे सरपंच राजेश फुले, सचिव स्नेहा गिरीपुंजे, केंद्र चालक अंजू गोंडाणे, पाहुणीत सरपंच कल्पना मिराशे, सचिव वेणू बांगडकर, केंद्र चालक छोटूलाल मिराशे, ग्राम पंचायत पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.