शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांकडून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 12:34 IST

भंडारा येथील तुमसर रोड रेल्वेस्थानकावर शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देमुलभूत सोयींच्या मागण्यांचे निवेदन द्यायला आले होते

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: येथील  तुमसर रोड  रेल्वेस्थानकावर शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. यावेळी उपस्थित असलेले आमदार राजू कारेमोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सकाळी  तुमसर रोड   रेल्वेस्थानकावर स्टेशन निरीक्षक गौतम बॅनर्जी हे निरीक्षणासाठी आले होते.  रेल्वे स्थानकावर मुलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या भेटीला आले. मात्र रेल्वे पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला व धक्काबुक्की करत मागे सारले. या घटनेच्या वेळी उपस्थित असलेले आमदार राजू कारेमोरे यांनी रेल्वे पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही पोलिस बधले नाहीत. पोलिस व कार्यकर्ते यांच्यादरम्यान शाब्दिक चकमकही उडाली. यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सीमा भुरे यांनी स्थानिक रेल्वे अधिक्षकांना कुकडे यांच्या भेटीची कल्पना दिली होती. मात्र बॅनर्जी यांचा दौरा कार्यालयीन असून त्यात राजकारणाचा संबंध नाही असे उत्तर त्यांना मिळाले होते. अखेरीस बॅनर्जी यांची दोन मिनिटे भेट घेऊन या प्रकरणावर पडदा पडला.

टॅग्स :railwayरेल्वे