शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव समितीच्या साक्षीने प्रेमीयुगुलाचे मिलन

By admin | Updated: July 24, 2016 00:34 IST

आईवडिलांचा विरोध झुगारून एका प्रेमीयुगुलाने लग्नाचा निर्धार केला. त्यांचे मनोमिलन चिचाळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला.

प्रकाश हातेल चिचाळ आईवडिलांचा विरोध झुगारून एका प्रेमीयुगुलाने लग्नाचा निर्धार केला. त्यांचे मनोमिलन चिचाळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या प्रेमीयुगुलाची समजूत घालून गावातील उपसरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत चिचाळ येथील तंटामुक्त समितीने प्रेमीयुगुलाचा सोहळा घडवून आणला. चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी येथील संजय जानबा (२२) यांचे घरासमोरील पौर्णिमा संजय पिसे (१९) हिच्यावर दोन वर्षापासून प्रेम होते. परंतु वरपक्षाकडून लग्नाची मागणी करण्यात आली तेव्हा मुलीच्या वडीलांनी लग्नास विरोध केला. प्रेमीयुगुलांनी गावातून पलायन करून चिचाळ येथील वराचे नातेवाईक माजी सभापती लघु खोब्रागडे यांच्या सहकार्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये व त्यांचा सदस्यांनी पुढाकार घेऊन वर व वधू पक्षाशी संपर्क करून समजूत घातली. शेवटी नकारात्मक बाजूचा विचार सोडून सकारात्मक भूमिका वर वधू पक्षाने घेतली. तंटामुक्त समितीच्या सहकार्याने लहू खोब्रागडे यांचे आवारात सर्वांच्या उपस्थितीत लग्न लावले. दोन जीवांचे मनोमिलन घडवून आले. उपस्थितीत मान्यवरांनी क्षमतेप्रमाणे भेट म्हणून रुपये दिले व दोघांचे जीवन सुखात जावो, असा आशीर्वाद दिला. या प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, पोलीस पाटील तुकेश वैरागडे, उपसरपंच दिलीप रामटेके, सरपंचा उषा काटेखाये, माजी सरपंच मुनीश्वर काटेखाये, महादेव उके, रुपचंद उके, लघु खोब्रागडे, प्रभावती खोब्रागडे, राजू काटेखाये, चंद्रशेखर काटेखाये, भूपेश काटेखाये, मधुसुदन काटेखाये, पंकज काटेखाये व ग्रामस्थ उपस्थित होते.