शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘डीजिटल ट्रान्समीटर’ सुविधेला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:35 IST

नागपुरसह मुंबई दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राचे कार्यक्रम बघता यावे, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी दुरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले.

ठळक मुद्दे‘एफएम’लाही सिग्नल मिळेना : दूरदर्शन केंद्राची उपमहासंचालकांनी केली पाहणी

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपुरसह मुंबई दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राचे कार्यक्रम बघता यावे, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी दुरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले. मात्र प्रसार भारतीचे अक्षम्य दुर्लक्ष तथा लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील एकमेव दुरदर्शन केंद्राची अवस्था बिकट झाली आहे. या केंद्राचे रूपांतरण ‘डीजीटल टेरिस्ट्रीअल ट्रान्समीटर’ मध्ये करण्यात यावे, असा सूर उमटत आहे.विशेष म्हणजे ‘लोकमत’ने २० नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करताच आकाशवाणी व दुरदर्शन मुंबईचे उपमहानिर्देशक कामलीयाल व नागपूर येथील अभियांत्रिकी संचालकांनी या केंद्राची पाहणी केली. भंडारा शहरातील मेंढा परिसरात असलेल्या दूरदर्शन केंद्रात योग्य नियोजनाअभावी व शासकीय धोरणाच्या उदासीनतेचे लक्षण ठरत आहे. सदर प्रसारण केंद्राच्या निर्मितीसाठी तेव्हा लक्षावधी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. आता पूर्ववत नवीन तंत्रज्ञान वापरून सदर केंद्र सुरू करण्यात आल्यास शेतकरी, व्यवसायिक, युवकांना प्रबोधन करणारे ठरू शकते. त्यामुळे हे केंद्र अद्यायावत करून सुरू करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.राज्यात उपेक्षित व मागास जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. नागपूर येथून प्रसारीत होत असणाºया कार्यक्रमांची जिल्ह्यात प्रसारीकरणासाठी ‘फ्रिक्वेन्सी’ योग्य प्रमाणात जिल्ह्यातील गाव खेड्यात पोहचत नसल्याने कार्यक्रमाच्या प्रसारीकरणाला व्यत्यय निर्माण होत होते. त्यामुळे जिल्ह्यात सॅटेलाईटची फिक्वेन्सी योग्य नसल्याने हे केंद्र १९९९ पासून सुरु केले आहे. तेव्हापासून २००७ पर्यंत दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारण सेवेचे व सह्यांद्री मुंबईचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे दिसत होते. परंतू २००७ नंतर दूरदर्शनवरुन राष्ट्रीय कार्यक्रमाचे व सह्याद्री चॅनलचे कार्यक्रम बंद करुन फक्त दूरदर्शनचे न्यूज चॅनल दिसत आहेत.आता ग्रामिण भागात व शहरातही आकाशवाणीचे कार्यक्रम दिसत नाहीत. त्यामुळे दूरदर्शनचे डिजिटल टेरिस्ट्रीअल ट्रांसमिटर लावून आकाशवाणी केंद्र सुरु करा अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी सुचना व प्रसारणमंत्री स्मृति इराणी तसेच आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र मुंबई येथील मुख्य अभियंत्यांना निवेदनाव्दारे केली होती. याअंतर्गत दोन दिवसांपूर्वी आकाशवाणी व दुरदर्शन मुंबईचे उपमहासंचालक व नागपूर येथील अभियांत्रिकी महासंचालकांनी या केंद्राची पाहणी केली.तर मिळेल सुविधाभंडारा येथील दूरदर्शन केंद्र बंद न करता सदर प्रक्षेपण केंद्र ‘डिजिटलाईज्ड’ करण्यात यावे, जेणेकरून येथे आकाशवाणी कार्यक्रमाचे सादरीकरण व एफएम सुविधाही कार्यान्वित होण्यास मदत होईल, अशी मागणी एका शिष्टमंडळाने महासंचालकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर सुविधा कार्यान्वित झाल्यास आकाशवाणीसह एफएम फ्रिक्वेन्सीही सहज मिळेल.