शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांत एसटीला ३.८० कोटींचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:49 IST

देवानंद नंदेश्वर।आॅनलाईन लोकमतभंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या १० महिन्यांत प्रवाशांकडून निव्वळ तिकिटातून ८८ कोटी ८४ लाख ८३ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसची देखभाल, अवैध वाहतूक, डिझेल, टोलटॅक्स आदीवरील खर्च वगळता विभागाला ३ कोटी ८० लाख ...

ठळक मुद्देभंडारा परिवहन विभाग : डिसेंबरपर्यंत तिकिटातून मिळाले ८८.८४ कोटी रुपयांचे उत्पन्न

देवानंद नंदेश्वर।आॅनलाईन लोकमतभंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या १० महिन्यांत प्रवाशांकडून निव्वळ तिकिटातून ८८ कोटी ८४ लाख ८३ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसची देखभाल, अवैध वाहतूक, डिझेल, टोलटॅक्स आदीवरील खर्च वगळता विभागाला ३ कोटी ८० लाख ३९ हजार रूपयांचा तोटा झालेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये ३ कोटी ५२ लाख रूपयांमध्ये वाढ झाली असली तरी विभाग तोट्यात गेला आहे.राज्यातील प्रवाशांचा भार आपल्या उरावर वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती केविलवाणी झाली आहे. यापासून भंडारा विभाग देखील सुटले नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा विभागातर्फे भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे एकूण सहा आगार आहेत. यासह भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी, लाखांदूर, आमगाव, देवरी, लाखनी, मोहाडी, गोरेगाव व अर्जूनी (मोरगाव) या १३ ठिकाणी बसस्थानके आहेत. तसेच भंडारा विभागातंर्गत ५९ प्रवासी निवारे आहेत. अकोला, शेगाव, वाशीम, परतवाडा, उमरखेड, माहूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, छिंदवाडा, बुलढाणा आदी शहरापर्यत लांब पल्ला वाहतूक चालविण्यात येते.भंडारा विभाग अंतर्गत भंडारा-साकोली, साकोली-लाखांदूर, साकोली-मोरगाव अर्जूनी, तिरोडा-गोंदिया, गोंदिया-आमगाव, पवनी-लाखांदूर, भंडारा-तुमसर या मार्गावर अवैध प्रवासी वाहनांच्या वर्दळीमुळे महामंडाळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. भंडारा विभागाला एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या १० महिन्यांच्या कालावधीत ८८ कोटी ८४ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात भंडारा आगाराला १९ कोटी ३६ लाख, गोंदिया १८ कोटी ३९ लाख, साकोली १८ कोटी ८६ लाख, तिरोडा ९ कोटी १६ लाख, तुमसर १६ कोटी २१ लाख तर पवनी आगारात ६ कोटी ८४ लाख रूपयांचा समावेश आहे. मागीलवर्षी डिसेंबरपर्यत भंडारा विभागाला ८५ कोटी ३२ लाखांचे उत्पन्न झाले होते.मागीलवर्षी डिसेंबरपर्यत १० महिन्यात भंडारा आगाराला १८ कोटी ७५ लाख, गोंदिया १८ कोटी ३५ लाख, साकोली १८ कोटी १५ लाख, तिरोडा ८ कोटी ६० लाख, तुमसर १५ कोटी ०६ लाख तर, पवनी आगाराला ६ कोटी ३८ लाखांचे उत्पन्न अधिक मिळाले होते.मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नामध्ये ३ कोटी ५२ लाखांनी वाढ झालेली आहे. उत्पन्नात वाढ झाली असली तरी डिझेल, टोलटॅक्स, कर्मचारी व इतर खर्च वगळता भंडारा विभागाला ३ कोटी ८० लाखाचा फटका सहन करावा लागला.आगारनिहाय उत्पन्नभंडारा आगाराला १९ कोटी ३६ लाख, गोंदिया १८ कोटी ३९ लाख, साकोली १८ कोटी ८६ लाख, तिरोडा ९ कोटी १६ लाख, तुमसर १६ कोटी २१ लाख तर पवनी आगारात ६ कोटी ८४ लाख रूपयांचा समावेश आहे.