शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारडीतील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांनी तक्रार केली असता त्यांनाच अरेरावी केली जात आहे. त्यामुळे पारडी परिसरातील शेतकरी गत अनेक दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकरणाविरोधात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पारडी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झाले. त्यामुळे परिसरातील मुर्झा, झरी, पारडी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विक्रीसाठी आणायला सुरुवात केली.

ठळक मुद्देशेतकरी झाले संतप्त : केंद्रातील ग्रेडरला तात्काळ हटविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाने शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव मिळावा यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. लाखांदूर तालुक्यातील पारडी येथे उन्हाळी धानासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या धान खरेदीलाच अधिक प्राधान्य देत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केली असता त्यांनाच अरेरावी केली जात आहे. त्यामुळे पारडी परिसरातील शेतकरी गत अनेक दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकरणाविरोधात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे.पंधरा दिवसांपूर्वी पारडी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झाले. त्यामुळे परिसरातील मुर्झा, झरी, पारडी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विक्रीसाठी आणायला सुरुवात केली. तालुक्यातील खरेदी विक्री सहकारी संस्थेअंतर्गत आधारभूत केंद्रावर एका ग्रेडरची येथे नेमणूक करण्यात आली आहे. मात्र ग्रेडर धान खरेदीसाठी शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच प्राधान्य देत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे.खरेदी केंद्रावर सातबाऱ्याविनाच सूर्यादयापासून धानाचे मोजमाप सुरु राहत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. येथे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याऐवजी साध्या वजनकाट्याने शेतकऱ्यांच्या धानाचे मोजमाप केले जात असून शेतकऱ्यांची लूट होत आहे.शासनाकडून हमाली दिली जात असताना ग्रेडर व हमाल शेतकऱ्यांकडून अतिरिक्त हमाली वसूल करीत आहेत. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना हेकेखोरपणे दमदाटी व अरेरावी करत होत असून या संबंधी तातडीने चौकशी करून केंद्रावरील ग्रेडरला तात्काळ हटविण्यात यावे यासंबंधीचे निवेदन बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले आहे.निवेदन देताना प्रोफेसर किरपान, नेपाल ठवकर, किशोर कन्नाके, भोजू ठलाल, शंकर मेंढे, ईश्वर मेश्राम, शालीकराम टेंभुर्णे, कांताबाई मेश्राम, धनपाल ठलाल, भोजराज लाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.शेतकऱ्यांनी ग्रेडरच्या विरोधात केलेली तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त होताच चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.-रामचंद्र परशुरामकर,सभापती खरेदी विक्री संस्था लाखांदूर.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड