शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सुरक्षा ठेवच्या नावाखाली ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:59 IST

आधीच भारनियमन व वाढीव वीज देयकामुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यावर महावितरणने सुरक्षा ठेवच्या नावाखाली पुन्हा ग्राहकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही अक्षरक्ष: ग्राहकांची लुटच आहे, असे बोलून ग्राहक संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देकारभार महावितरणचा : ग्राहकांमध्ये व्यक्त होतोय संताप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधीच भारनियमन व वाढीव वीज देयकामुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यावर महावितरणने सुरक्षा ठेवच्या नावाखाली पुन्हा ग्राहकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही अक्षरक्ष: ग्राहकांची लुटच आहे, असे बोलून ग्राहक संताप व्यक्त करीत आहे.राज्यभरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे विद्युत पुरवठा केला जात असला तरी सर्वाधिक वीज निर्मिती ही विदर्भात होते. तरीही पूर्व विदर्भात सर्वाधिक भारनियमन केले जाते.लोकसभा निवडणुकीच्या काळात आठ तास विद्युत पुरवठा खंडित व्हायचा. त्यात वाढ करून आता तर ग्रामीण क्षेत्रात दहा - दहा तास विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिणामी उन्हाळी धान घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.दुसरीकडे सुरक्षा ठेव जमा करण्याच्या नावावर महावितरणने नवीन फतवाच काढला आहे. विद्युत देयकासोबत सुरक्षा ठेव भरण्यासंदर्भातले देयकही ग्राहकांना एप्रिल महिन्याच्या बिलासोबत देण्यात आले आहे. काही तालुक्यात काही महिन्यांपुर्वी सुरक्षा ठेवचे देयक देण्यात आले होते.वीज खंडित होणे नित्याचीच बाबउन्हाळा सुरू होताच भारनियमनाचे चटकेही बसायला सुरूवात होते. भंडारा शहरात भारनियमनाचा प्रभाव तेवढा जाणवत नसला तरी ग्रामीण क्षेत्रात शेतीसाठी भारनियमनाचा बडगा उगारला जात आहे. वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे शहर भागातही विजेचा लंपडाव सुरूच असतो. वीज गळतीचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे. या दरम्यान वाढीव सुरक्षा ठेवच्या बिलामुळे ग्राहकांचे टेंशन मात्र हमखास बळावले आहे.सुरक्षा ठेव कशासाठी?सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) आवश्यक असल्याचे सांगून नवीन कनेक्शन देताना महावितरण सदर रक्कम घेत असते. बहुतांश ग्राहक जुनेच असल्याने त्यांनी त्याचवेळी सुरक्षा ठेव भरलेली आहे. दरम्यान ग्राहक वीज वापरल्यानंतर त्याचे बिल देतात. ते मागील महिन्यात त्यांच्या वापरासाठी बिल प्राप्त केल्यानंतरच देयक देतात. बिल देण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो. कोणताही ग्राहक बिलाचा भरणा करीत नसल्यास वीज पुरवठा नोटीस दिल्यानंतर आणि काही कालावधी झाल्यावर कमी केला जाऊ शकतो. परंतु अशा प्रकरणांमध्ये झालेल्या नुुकसानीला टाळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या बिलांच्या घरगुती ग्राहकाकडून एक महिन्याचे सरासरी विजेचे समतुल्य बिल सुरक्षा ठेव म्हणून जमा केले जाते. त्यात हा कालावधीही महावितरण बदलू शकते.