शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जेवनाळा येथील मालगुजारी तलावाचे रूप पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले मातीचे ढिगारे सपाटीकरण करून तलावाचे तोो तोंड खुले करण्यात आल्याने पावसाळ्यात येणारे पाणी नक्कीच तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे .

ठळक मुद्देमातीचे ढिगारे झाले दूर : जलसाठ्यात वाढ, शेतीला व जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : गाव तलाव अर्थात मामा तलाव शेतकरी व गावकऱ्यांना मोठे वरदान ठरलेले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या तलावातून कित्येक पशुपक्षी, जनावरे यांची तृष्णा शांत होत पर्यावरण समतोल राखण्यासाठी यांची मोठी मदत झालेली आहे.लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील जेवणाला येथील मामा तलाव विस्तीर्ण जागेत असून सूमारेअडीचशे ते तीनशे एकर खरीपात सिंचन होऊन शेतकऱ्यांना मदत होते. गावातील खाजगी विहिरीला सुद्धा या तलावातून पाझर माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या मोठी मदत शक्य आहे.जून २०१८ ला जल शिवार योजनेतून खोली करण्याचे काम हाती घेतले गेले. यातून तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले मातीचे ढिगारे सपाटीकरण करून तलावाचे तोो तोंड खुले करण्यात आल्याने पावसाळ्यात येणारे पाणी नक्कीच तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे . जेवढा पाणी तलावात साचेल तेवढी मदत गरजूंना नक्कीच होईल. गाव तलाव गावच्या सौंदयार्चा व श्रीमंतीचा एक अंग असल्याने प्रत्येक गावकºयांनी मामा तलावाची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मामा तलावाचे अस्तित्व टिकविण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत मामा तलावाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मे हिट मध्ये सुद्धा आजही तलावात भरपूर पाणी असल्याने तलावाचे अस्तित्व महत्त्व आपोआपच समोर येते आहे.गाव तलावाच्या विकासासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, सौंदर्यीकरण करीत तलावाचे जलशाठ्यात प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती वाढत असता त्याची निगा राखणे व देखभाल-दुरुस्ती वेळेत करणे अत्यावश्यक झाले आहे. पाणी हे जीवन असल्याने गावकऱ्यांनी मामा तलावांना गावाची संपत्ती समजत काळजी घेणे अगत्याचे आहे.जेवनाळा येथील मामा तलावाच्या पाळीवरील मातीचे ढिगारे दूर झाल्याने तलावात येणाºया पाण्याचा प्रवाह खुला होत तलावाची शान अबाधित राहायला मोठी मदत होईल. शासनासह प्रत्येक गावकºयांनी सुद्धा तलावाच्या अस्तित्वाची व नियोजनााची काळजी घेणे गरजेचे आहे. लघुपाटबंधारे विभाग यांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.-नितीन रणदिवे, सामाजिक कार्यकर्ता जेवनाळा

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प