शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

प्रेमीयुगुलांच्या एकांतवासावर नजर

By admin | Updated: July 27, 2015 00:38 IST

शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुलांचा मुलींशी संपर्क येतो. यातूनच त्यांची मैत्री होते आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेम संबधात होते.

पालक अनभिज्ञ : बदनामीच्या भीतीपोटी अनेक प्रकरणे गुलदस्त्यातभंडारा : शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुलांचा मुलींशी संपर्क येतो. यातूनच त्यांची मैत्री होते आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेम संबधात होते. मग महाविद्यालयातील गर्दीतून वाट काढत ही तरूणाई एकांताच्या शोधात शहराबाहेर जाऊ लागते. सध्या अशा प्रेमीयुगुलांची जोडपी जंगल परिसरात फिरताना दिसून येत आहेत. मात्र हा एकांत त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. अशाच प्रेमीयुगुलांवर काही विकृत प्रवृत्तीच्या टोळक्यांची नजर असून अनेक जोडप्यांना वाईट ‘अनुभव’ आला असला तरी बदनामीच्या भीतीपोटी अनेक प्रकरणे बाहेरच आलेली नाही. परिणामी विकृतांची हिंमत वाढत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या नव्या सत्राला आरंभ झाला आहे. याच निमित्ताने प्रेमीयुगुलांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे. अनेक प्रेमीयुगुल शाळा, महाविद्यालयाला बुट्टी मारुन एकांताच्या शोधात शहराबाहेर पडू लागले आहेत. शहराबाहेरील काही ठिकाणे निर्जन असून त्या परिसरात रहदारी अतिशय कमी आहे. त्यामुळे एकांतासाठी प्रेमीयुगुल अशा स्थळांना पसंती देतात. परंतु, आता याच प्रेमीयुगुलांवर काही विकृत प्रवृत्तीच्या टोळक्याची नजर आहे. निर्जन परिसरात या टोळक्याला असे प्रेमीयुगुल दिसल्यास त्यांच्या जवळील पैसे, मोबाईल लुटले जात आहे. यापूर्वी या टोळ्यांकडून प्रियकाराला मारहाण करुन प्रेयसीवर अत्याचार करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. विशेष म्हणजे, हे प्रेमीयुगुल सर्वांची नजर चुकवून एकांतात गेल्याने अत्याचार झाल्यानंतरही भीतीपोटी त्यांना गप्प रहावे लागत आहे. यातूनच अशा गुन्हेगांराची हिम्मत वाढत आहे. याप्रकारावर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी पालकांनीही याविषयात सावध असावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. जनजागृतीची गरज कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर निषेध करण्यापेक्षा ती घटना घडायलाच नको, यासाठी सामाजिक संस्थाकडून शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्याची गरज आहे. त्यातून अशा प्रकारावर काही प्रमाणात आळा बसू शकतो. मागील काही गुन्ह्यांवर नजर टाकली तर छेडखानी, लुटमार, अत्याचार यासारखे गुन्हे निर्जनस्थळी घडल्याचे निदर्शनास येते. अशा प्रेमीयुगुलांना टारगेट करुन एकांताचा फायदा घेत त्यांच्यावर शारिरीक अत्याचार तसेच त्यांच्याजवळून वस्तू लुटणाऱ्या काही टोळ्या फिरत आहेत. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी अशा निर्जनस्थळी जाणे टाळावे. तरच अशा घटनांवर आळा घालता येईल. (शहर प्रतिनिधी)महिला पोलिसांची गस्त पाळतीवरभंडारा शहरात सुनसान जागेवर महिला पोलिसांची विशेष गस्तपथक नियुक्त केले आहे. शाळा मुख्याध्यापक, ट्यूशन क्लासेसचे संचालक यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहून पोलिसांना कळविण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. कुणालाही अडचणी आल्यास त्यांनी निसंकोचता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.- हेमंत चांदेवार,पोलीस निरीक्षक, भंडारा.या भागात सुरू आहे प्रेमीयुगुलांचा वावर शहराबाहेरील कोरंभी, झिरी, चांदपूर, कोका जंगल आदी ठिकाणे शहरापासून लांब असून येथे लोकवस्ती कमी आहे. या भागात प्रेमीयुगुलांचा जास्त वावर असून या भागात कोणताही गुन्हा घडल्यास कोणाचेही लक्ष जात नाही. त्यामुळे या भागात प्रेमीयुगुलांनी जाणे टाळण्याची गरज आहे.पालकांनी लक्ष देण्याची गरज घरातून शाळा, महाविद्यालयासाठी निघालेला मुलगा, मुलगी कॉलेजमध्येच गेला ना? याची माहिती पाल्यांना असणे गरजेचे आहे. तो, ती नियमीत कॉलेजला जात आहे, याची खात्री वेळोवेळी करुन घेणे आवश्यक आहे. घरी उशिरा आल्यास कुठे होता, याची विचारपूस करण्याची गरज आहे. अन्यथा एखाद्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल, याची शक्यता नाकारता येत नाही.