शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ने समाजकारणातून आपले वेगळेपण जपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

स्वातंत्र्य संग्रामसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेअंतर्गत मंगळवारी मोहाडी येथील सुलोचना देवी पारधी विद्यालय तथा सुदामा कनिष्ठ महाविद्यालयात रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन आमदार राजू  कारेमोरे यांनी बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार व अभिवादन करून केले.

ठळक मुद्देराजू कारेमोरे : मोहाडी येथे ‘लोकमत’च्यावतीने रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सामाजिक प्रबोधनाची चळवळ ‘लोकमत’ने प्रारंभापासूनच उभी केलेली असून, ही चळवळ आजही जपली जात आहे. ‘रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘लोकमत’ने समाजकारणातून वेगळेपण जपले आहे, असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी येथे केले.स्वातंत्र्य संग्रामसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेअंतर्गत मंगळवारी मोहाडी येथील सुलोचना देवी पारधी विद्यालय तथा सुदामा कनिष्ठ महाविद्यालयात रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन आमदार राजू  कारेमोरे यांनी बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार व अभिवादन करून केले. अध्यक्षस्थानी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश हटवार होते.  प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, भाजप ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री दिनेश निमकर, भाजप ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रविकांत देशमुख, भाजप युवा मोर्चा जिल्हा महासचिव शैलेश गभने, तहसीलदार देविदास बोंबर्डे, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, मुख्याध्यापक अविनाश चौधरी, कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, निमाचे डॉ.  प्रशांत थोटे, मोहाडीचे ठाणेदार राहुल देशपांडे, सिराज शेख, संजय मते, यशवंत थोटे उपस्थित होते. रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. मीरा सोनवणे, रक्तपेढी तंत्रज्ञ सीमा तिजारे, लोकेश गोटफोळे, राहुल गिरी, पल्लवी अतकरी, जीवन आगाशे, प्रदीप सपाटे, विनोद बोरकर, रमेश ठवकर, हेमंत लोनदासे, चुन्‍नीलाल आगाशे, ललित घाटबांधे, विनोद भगत यांनी परिश्रम घेतले. या शिबिराला राजेश हटवार, सदाशिव ढेंगे यांचे विशेष सहकार्य लाभले. संचालन राजू बांते यांनी, तर आभार युवराज गोमासे यांनी मानले. लोकमतच्यावतीने जिल्हाभर रक्तदान मोहीम राबविली जात आहे. नागरिकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक जाणीवेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मोहाडी येथील शिबिरालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

यांनी केले रक्तदान  - शिबिरात नरेंद्र निमकर,  उमाकांत बारापात्रे, ज्ञानेश्वर हाके, गजानन नान्हे, वैभव जाधव, संजय बडवाईक, मिथुन चांदेवार, रविकांत देशमुख, शैलेश गभने, दिनेश निमकर, राजेंद्र मेहर, रतन शेंडे, दिनेश बांते, खुशाल बारई, अंकुश ढबाले, अजय कुंभारे यांनी रक्तदान केले. तरूणांचा सहभाग मोठा दिसून आला.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट