शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Lok Sabha Election 2019; स्थिर संरक्षण पथकाकडून विशेष वाहन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:00 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट, तसेच स्थिर संरक्षण पथके नेमण्यात आली आहेत. त्याअंतर्गत जिल्हा सीमेवरील खरबी (नाका) येथे वाहणाची कसून चौकशी, तसेच संशयीत वाहनांची विशेष तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसंशयीतांची कसून चौकशी : तपासणीचे व्हिडीओ चित्रीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट, तसेच स्थिर संरक्षण पथके नेमण्यात आली आहेत. त्याअंतर्गत जिल्हा सीमेवरील खरबी (नाका) येथे वाहणाची कसून चौकशी, तसेच संशयीत वाहनांची विशेष तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता जाहिर झाल्यापासून जिल्ह्याच्या प्रवेश सीमांवर जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली असल्याची माहिती ठाणेदार सुभाष बारसे यांनी दिली. अवजड वाहनांसह, दुचाकीचालकांची या मार्गावरुन वाहतूक सुरु असते.नागपूर आणि भंडारा जिल्ह्याची हदद म्हणून खरबी (नाका) हे गाव सीमेवर असल्याने येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने व पोलीस प्रशासनाकडून स्थिर संरक्षण पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.यामध्ये तलाठी हरिदास खोंडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय सुदाम कांबळे, ग्रामसेवक शेख, कॅमेरामन प्रज्वल शेंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.यावेळी माहिती देताना खोंडे यांनी सांगितले की, संशयीत वाहनांची विशेष चौकशी करत असल्याने अद्यापतरी कोणताही अनुचीत प्रकार आढळून आला नसल्याची माहिती दिली. आतापर्यंत किमान ५०० पेक्षा जास्त वाहनांची तपासणी झाल्यांचे त्यांनी सांगितले.जिल्हा सीमेवरील खरबी नाका येथे तपासणीभंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जवाहर पोलीस ठाण्याअंतर्गत खरबी (नाका) येथे ‘स्थिर संरक्षण पथकाकडून’ खरबी नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर व्हिडीओ कॅमेराच्या निगराणीखाली तपासणी होत असल्याची माहिती ठाणेदार सुभाष बोरसे यांनी दिली. तसेच प्रत्येक वाहनांची नोंद ठेवत स्थिर पथकाची सतत अपडेट घेतली जाते. दोन जिल्ह्याच्या प्रवेशावरील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठी वाहतुक होत असल्याने याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.राष्ट्रीय महामार्गावरील खरबीचा पहिलाच स्थिर संरक्षण पथक असल्याने पथकातील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.-हरीदास खोंडे, तलाठी खरबी पथक प्रमुखलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचारसभेसाठी येणाऱ्या नेतेमंडळीचे जिल्ह्यात येणे जाणे याच मार्गावरुन असल्याने, या जिल्हा हद्दीतील चेकपोस्टवर विशेष भर देवून व्हिडीओ कॅमरोच्या निगराणीखाली वाहनांची तपासणी सुरु आहे.-सुभाष बोरसे, ठाणेदार जवाहरनगर पोलीस ठाणे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019