शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

Lok Sabha Election 2019; भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी अखेर शिवसैनिक उतरले मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:57 IST

भाजपा-शिवसेना युतीत भंडारा-गोंदिया मतदार संघ भाजपाच्या वाट्याला गेला आहे. मातोश्रीवरून आलेल्या युतीधर्माच्या आदेशाचे पालन करीत शिवसैनिक भाजपा उमेदवाराच्या प्रचारात स्वत:ला झोकून देत आहेत.

ठळक मुद्दे‘हम साथ साथ है’ : विधानसभेवर डोळा ठेवून प्रचार, शिवसेनेचे स्वतंत्र नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजपा-शिवसेना युतीत भंडारा-गोंदिया मतदार संघ भाजपाच्या वाट्याला गेला आहे. मातोश्रीवरून आलेल्या युतीधर्माच्या आदेशाचे पालन करीत शिवसैनिक भाजपा उमेदवाराच्या प्रचारात स्वत:ला झोकून देत आहेत. सुरुवातीला असलेला समन्वयाचा अभावही आता दूर झाला असून नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक गावागावात निघणाऱ्या प्रचाररॅलीत आणि सभांमध्येही प्रामुख्याने दिसू लागले आहेत.भंडारा जिल्ह्यात शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. २००९ च्या विधानसभा निंवडणुकीत भंडारा येथून शिवसेनेचा आमदारही झाला होता. गावागावात शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीला शिवसेना आणि भाजपा यांच्या समन्वयाचा अभाव दिसत होता. मात्र आता तोही दूर झाला असून ‘हम साथ साथ है’ म्हणत शिवसैनिकही आता प्रचाराला लागले आहेत. शिवसेनेने भंडारा शहरात स्वतंत्र प्रचार कार्यालय उघडले नसले तरी जिल्हा शिवसेनेच्या कार्यालयातूनच प्रचाराची सूत्रे हालत आहेत.सकाळपासून या ठिकाणी भगवे दुपट्टे घातलेले शिवसैनिक एकत्र होतात. प्रचाराचे नियोजन केले जाते. दिवसभर गावागावात प्रचार करून सायंकाळी पुन्हा ही मंडळी कार्यालयात एकत्र होतात. दिवसभर शुकशुकाट असला तरी सकाळी आणि सायंकाळी शिवसैनिकांची वर्दळ या कार्यालयात दिसून येते. शिवसैनिक एकदिलाने मतदारांशी संवाद साधत प्रचार करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.युतीधर्माच्या आदेशाचे पालन करीत वरिष्ठ पातळीवरील नेतेही सभा आणि प्रचाररॅलीत दिसून येत आहेत. काही ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात समन्वयाचा थोडा अभाव दिसून येतो. शिवसेनेला फारसे विचारात घेतले जात नसल्याने नाराजी दिसत आहे. मात्र निवडणुकीच्या काळात दोन्ही पक्षाकडून वातावरण अनुकुल असल्याचे दाखविले जाते.अवघ्या सहा महिन्याने येणाºया विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवत शिवसैनिक आता भाजपाच्या प्रचारात जोमाने लागल्याचे दिसत आहेत. वाढत्या उन्हाच्या झळा सोसत शिवसैनिक आपल्या मित्रपक्षासाठी राबताना दिसत आहेत. मनभेद असले तरी प्रचारावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. उशिरा का होईना शिवसैनिक युतीधर्म पाळण्यासाठी मनापासून कामाला लागले.मित्र पक्षांची मोलाची साथकोणताही किंतु परंतु मनात न ठेवता शिवसेना आणि आरपीआयचा आठवले गट आमच्या सोबत प्रचारात मेहनत घेत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी सर्व घटकपक्ष आपल्या सोबत आहे.-सुनील मेंढे, भाजपा उमेदवारक्षेत्रनिहाय दौरे करून गावागावांत प्रचारयुती धर्म पाळण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच भाजपसोबत आहोत. प्रचाराचे नियोजन करून जिल्हा परिषद क्षेत्र निहाय दौरे करीत आहोत. नेत्यांच्या सभांनाही आम्ही उपस्थित राहत आहोत. गावागावात प्रचार सुरू आहे.-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार, शिवसेनाविधानसभा मतदार संघातील मित्र पक्षाच्या कार्यालयात काय दिसते?१. भंडारा : शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसैनिकांची सकाळपासून वर्दळ दिसून आली. जिल्हा प्रमुखांच्या निर्देशांच्या प्रचाराचे नियोजन सुरु होते.२. तुमसर : शिवसेना उपजिल्हा प्रमुखाच्या कार्यालयात प्रचाराची सुत्रे हलताना दिसत होती. भाजपाशी समन्वय साधून नियोजन केले जात होते.३. साकोली : शिवसेनेने स्वतंत्र कार्यालय उघडले नाही. मात्र भाजपाच्या कार्यालयातून प्रचाराच्या कामाला लागत आहेत. भाजपाच्या नियोजनानुसार सहकार्य करतात.४. गोंदिया : शिवसेनेने स्वतंत्र कार्यालय उघडले असून प्रचाराचे नियोजन करून शिवसैनिक बाहेर पडत असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच शिवसैनिकांची येथे गर्दी होती.५. तिरोडा : शिवसेनेचे स्वतंत्र प्रचार कार्यालय नाही. मात्र येथील पदाधिकाऱ्यांच्या घरूनच प्रचाराची धुरा सांभाळली जात आहे. शिवसैनिक येथूनच प्रचारासाठी जातात.६. अर्जुनी (मोरगाव) : स्वतंत्र प्रचार कार्यालय नसले तरी भाजपाच्या प्रचार कार्यालयातून शिवसैनिक प्रचारासाठी निघतात. भाजपसोबत शिवसैनिकही उत्साहात दिसत होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019