शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

Lok Sabha Election 2019; पत्र आलं कलेक्टरचं, चला गुरूवारी मतदानाला जाऊ या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:44 IST

एकेकाळी पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारी पिढी आता लुप्त झाली. फेसबुक, व्हॉटअप, ट्विटर, इन्स्टाग्रामपच्या माध्यमातून तात्काळ निरोप पोहचत आहे. परिणामी आता पोस्टमनदादा पत्र घेऊन येत नाही आणि कुणाला त्याची उत्स्तुकताही नाही. मात्र भंडारा जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत विस्मृतीत गेलेल्या पोस्टकार्डचा मतदान जनजागृतीसाठी मोठ्या कल्पक्तेने उपयोग केला. पत्र आलं कलेक्टरचं, चला गुरूवारी मतदानाला जाऊ या, अशी कुजबुज गावागावात ऐकायला येत आहे.

ठळक मुद्देविस्मृतीतील पोस्टकार्ड मतदानांच्या भेटीला : भंडारा जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम, तीन लाख ७५ हजार कुटुंबांना देणार पत्र

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकेकाळी पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारी पिढी आता लुप्त झाली. फेसबुक, व्हॉटअप, ट्विटर, इन्स्टाग्रामपच्या माध्यमातून तात्काळ निरोप पोहचत आहे. परिणामी आता पोस्टमनदादा पत्र घेऊन येत नाही आणि कुणाला त्याची उत्स्तुकताही नाही. मात्र भंडारा जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत विस्मृतीत गेलेल्या पोस्टकार्डचा मतदान जनजागृतीसाठी मोठ्या कल्पक्तेने उपयोग केला. पत्र आलं कलेक्टरचं, चला गुरूवारी मतदानाला जाऊ या, अशी कुजबुज गावागावात ऐकायला येत आहे.आधुनिक प्रसार माध्यमाच्या काळात पोस्टकार्ड लुप्त झालं. कित्येकांच्या घरी तर दोन-तीन दशक झाली पत्रच आले नाही. मात्र या गत स्मृतींना उजाळा देण्याचे काम यंदा जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.बीएलओच्या माध्यमातून पोस्टकार्ड आणि फोटो व्होटर स्लिप तीन लाख ७५ हजार कुटुंबापर्यंत पोहचवली जात आहे. या पत्रात मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलेच आहे. सोबत ओळखपत्र म्हणून कोणती ११ दस्तावेज लागतात. याची माहिती देण्यात आली आहे.पोस्टकार्ड मतदान जागृतीचे प्रभावी माध्यमभंडारा जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी सुरू केलेला पोस्ट कार्डचा उपक्रम कौतुकास्पद आहे. पोस्टकार्ड ही संकल्पना मतदार जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम ठरेल. नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा हा कल्पक उपक्रम असून पोस्टकार्डसारखे पारंपारीक संदेश माध्यम वापरून मतदारांना प्रोत्साहित करण्याची ही कल्पना भन्नाट आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल.-डॉ. पार्थ सारथी मिश्रा, मुख्य निवडणूक निरीक्षक, भंडाराअसा आहे पोस्टकार्डमध्ये मतदारांना संदेशप्रिय मतदार,आपणास कळविताना आनंद होत आहे की, आपण भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी निवडूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून मतदान म्हणून नाव नोंदविले. त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन!आपणास माहितीच आहे की, देशामध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. आपण निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही भक्कम करण्याच्या कार्यात सहभागी व्हा, लोकशाहीचे आधारस्तंभ बना व राष्ट्र उभारणीच्या उत्तात कार्याचे साक्षीदार व्हा.-शांतनू गोयल, जिल्हाधिकारी, भंडारा.बीएलओ पोहचविणार घरपोच पोस्ट कार्डमतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदार जनजागृतीचे पोस्टकार्ड घरोघरी पोहचविले जाणार आहे. या पोस्टकार्डचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी, विलास ठाकरे, अभिमन्यू बोदवळ, डीएसओ रमेश बेंडे, उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर व स्विपच्या नोडल अधिकारी कावेरी नाखले उपस्थित होते.वंचित न राहो कुणीही मतदार1. लोकसभा निवडणुकीत कुणीही मतदार वंचित राहणार नाही यासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे.2. पोस्टर, होर्डिंग, कलापथक, सोशल मिडियाच्या माध्यमातून जनजागृती होत आहे.3. भंडारा निवडणूक विभाग असा अभिनव उपक्रम राबविणारा एकमेव जिल्हा असावा.4. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला असून सर्व शासकीय यंत्रणा यासाठी कामाला लागली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया