लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात सासंद आदर्श ग्राम योजना सुरू केली. या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार होता. मात्र मागील पाच वर्षांत मोदी सरकारने किती गावे आदर्श केली हे सांगावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी तिरोडा तालुक्यातील सेजगाव, इंदोरा बु. करटी, मुंडीकोटा, केसलवाडा येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.या वेळी प्रामुख्याने माजी आ.दिलीप बन्सोड, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, कैलाश पटले, निता रहांगडाले, योगेंद्र भगत, राधेलाल पटले उपस्थित होते. वर्षा पटेल म्हणाल्या, खा.प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव दत्तक घेवून या गावाचा सर्वांगिन विकास केला.येथील लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले. त्यामुळे भाजप नेत्यांनी या गावात जावून आदर्श गाव कसे असते हे पाहण्याचा सल्ला दिला. मोदी सरकारला केवळ खोटी आणि मोठी आश्वासनेच देता येते, प्रत्यक्षात मागील पाच वर्षांत दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केली नसल्याचे सांगितले.केवळ पोस्टरबाजी करुन महिलांचा सन्मान केल्याचे मोदी सरकार सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात याविरुद्ध चित्र आहे.अशा जुमलेबाज सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. तसेच येत्या ११ एप्रिलला सजग राहून मतदान करण्याचे व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले.
Lok Sabha Election 2019; किती गावे आदर्श केली? हे भाजप सरकारने सांगावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:23 IST
मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात सासंद आदर्श ग्राम योजना सुरू केली. या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार होता. मात्र मागील पाच वर्षांत मोदी सरकारने किती गावे आदर्श केली हे सांगावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला.
Lok Sabha Election 2019; किती गावे आदर्श केली? हे भाजप सरकारने सांगावे
ठळक मुद्देतिरोडा तालुक्यात वर्षा पटेल यांची प्रचार सभा