शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

Lok Sabha Election 2019; भूलथापा देणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:39 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार संसदेत खासदार शपथ घेताना घटनेशी एकनिष्ठ राहून धर्म, जात, पंथ हा भेद न करता प्रत्येकाला न्यायाची हमी देणे, भयमुक्त वातावरणाची निर्मिती करण्याची शपथ घेतो. या शपथेला विद्यमान पंतप्रधानांनी हरताळ फासला आहे.

ठळक मुद्देशरद पवार : तुमसरच्या सभेत भाजप सरकारवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार संसदेत खासदार शपथ घेताना घटनेशी एकनिष्ठ राहून धर्म, जात, पंथ हा भेद न करता प्रत्येकाला न्यायाची हमी देणे, भयमुक्त वातावरणाची निर्मिती करण्याची शपथ घेतो. या शपथेला विद्यमान पंतप्रधानांनी हरताळ फासला आहे. कुटुंबाबद्दल वैयक्तीक टीका करणे, संविधानिक संस्था संपविण्याचा डाव आखण्यात येत आहे. जीवनात मोदीसारखा पंतप्रधान मी बघितला नाही. दिलेली आश्वासने न पाळता केवळ भुलथापा देणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत खासदार शरद पवार यांनी केले.तुमसर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मधुकर कुकडे, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार राजेंद्र जैन, आनंदराव वंजारी, अनिल बावनकर, प्रमोद तितीरमारे, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, अभिषेक कारेमोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, सीमा भुरे, माधवराव बांते, कल्याणी भुरे, रेखा ठाकरे, ज्वाला धोटे, राजेश देशमुख, योगेश सिंगनजुडे, डॉ.पंकज कारेमोरे, देवचंद ठाकरे, वासू बांते, ठाकचंद मुंगुसमारे, प्रफुल्ल बिसेन, शुभम गभणे उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहेत. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. मी मुख्यमंत्री असताना एका शेतकºयाने आत्महत्या केली होती. तेव्हा भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना गळफास लावण्याची मागणी केली होती. आता दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर भाजपच्या मुख्यमंत्र्याचे काय करावे असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. अनिल अंबानी यांना राफेल विमान तयार करण्याचे कंत्राट दिले. ज्यांना कागदाचे विमान तयार करता येत नाही, त्यांना राफेलचे कंत्राट कसे दिले, असा सवाल केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर केलेल्या सैन्य कारवाईचे श्रेय पंतप्रधान मोदींनी घेतले. फ्लाईट लेफ्टनंट अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. परंतु चार वर्षापासून कुलभूषण जाधव यांची सुटका ५६ इंचाच्या छाती असलेल्या पंतप्रधानांनी का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. संचालन विजय डेकाटे यांनी तर आभार अ‍ॅड. शिशिर वंजारी यांनी केले.विकासासाठी कटीबद्ध- प्रफुल्ल पटेलमी सध्या राज्यसभेचा खासदार आहे. पुन्हा तीन वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असल्याने लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ माझी कर्मभूमी आहे. येथील विकासाकरिता मी कटीबद्ध आहे. येथील जनता माझ्यावर खूप प्रेम करते. परंतु माझ्या निवडणुकीत ते मतपेटीतून दिसले नाही. विकासासाठी आपण पूर्ण शक्ती लावण्याची ग्वाही पटेल यांनी दिली. यावेळी राकाँ-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019