शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Lok Sabha Election 2019; १८ लाख मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:54 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

ठळक मुद्देआज मतदान : पोलिंग पार्टी रवाना, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात २१८४ मतदान केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून बुधवारी विधानसभा मुख्यालयातून पोलिंग पार्टी नियुक्त मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. १३ हजार मनुष्यबळाच्या मदतीने ही निवडणूक पार पडणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २ हजार १८४ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. सहा विधानसभा मतदार संघात १८ लाख ८ हजार ९४८ मतदार असून त्यात नऊ लाख पाच हजार ४९० पुरुष आणि नऊ लाख तीन हजार ४५८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी रवाना झाले. भंडारा विधानसभा मतदार संघाचे पोलिंग पार्टीला मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण नाथ पांचाळ यांनी मतदान साहित्य देवून रवाना केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर उपस्थित होते.तुमसर विधानसभेसाठी मुकूंद टोनगावकर, साकोली विधानसभेसाठी मनिषा दांडगे, अर्जुनी मोरगाव शिल्पा सोनाले, गोंदिया अनंत वळसकर, तिरोडा जी. एन. तळपते यांनी मतदान साहित्य देवून पोलीस पार्टीला रवाना केले. स्ट्राँग रुम तयार करण्यात आले असून त्याठिकाणी पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.मतदान करणे केवळ हक्क नसून कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याचा संकल्प करावा. लोकसभेसाठी पाच वर्षातून एकदा येणाऱ्या मतदानाच्या संधीचे मतदान करून सोने करा व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्या असे आवाहन मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थसारथी मिश्रा व जिल्हाधिकारी शांतून गोयल यांनी केले आहे.गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान आटोपल्यानंतर सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुप मध्ये कडक बंदोबस्तात ठेवली जाणार आहेत.तब्बल दीड महिन्यानंतर मतमोजणी होणार असल्याने त्याठिकाणी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळमतदानासाठी सुटीलोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे. आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. सुटी ही मतदान करण्यासाठी असून आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच अन्य कामासाठी जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.मतदान करण्याचे प्रशासनाचे आवाहनमतदारांनी जास्तीत जास्त व शांततेत मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शांतनू गोयल, गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, गोंदिया पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले आहे.सखी व आदर्श मतदान केंद्रनिवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात महिला व्यवस्थापीत मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील भंडारा, साकोली, तुमसर क्षेत्रात सात तर गोंदिया जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर महिला राहणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.दिव्यांगासाठी सुविधानिवडणूक आयोगाने महिला व दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध केल्या आहे. दिव्यांगासाठी रॅम्प, व्हिलचेअर, पिण्याचे पाणी, शौचालय व बसण्याची सुविधा राहणार आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. उन्हापासुन बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.१३ हजार मनुष्यबळ सज्जनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने पुरेशे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्ह्यात १२२१ मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून ६२६० अधिकारी-कर्मचारी तर गोंदिया जिल्ह्यासाठी ९७३ मतदान केंद्रावर ४२७९ अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी सहाही विधानसभा मतदार संघात पोलिसांसह १३ हजार २९२ अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019