लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : १५ दिवसांपासून गावकरी नळधारकांनी पिण्याचे पाणी मिळाले नाही. ग्रामपंचायत व वरिष्ठ प्रशासनाची दिरंगाईमुळे नळधारक महिलांनी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील कार्यालयाला कुलूप ठोकले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दाखल झाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे याप्रसंगी आवाहन त्यांनी केले.सार्वजनिक विंधन विहिरीचे सुरळीत सुरु असलेले पाणी, नुकतेच लगतच्या शेतकऱ्याने खोदलेली विंधन विहिरीचे पाणी शेताबांध्याला देत असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजनेवर प्रतिकुल परिणाम पडले आहे. त्यामुळे गावात १५ दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. स्थानिक ग्रामपंचायतीने शासन व प्रशासन यांना पत्रव्यवहार व वरिष्ठ विभागाला याबाबतीत लेखी कळवूनही यावर योग्य तोडगा काढण्यात आलेला नाही.परिणामी मंगळवारला गावकºयांनी सौम्य आंदोलनाचा मार्ग पत्करून शेतीच्या कामावर न जाता संपूर्ण नळधारक नागरिक विशेषकरून महिलांनी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वरिष्ठांना याबाबत पोलीस बंदोबस्ताची मागणी केली.पोलीस निरीक्षक एम.के. बारसे पोलीस उपनिरीक्षक एस.जी. खेडेकर आपल्या ताफ्यानिशी घटनास्थळी दाखल झाले. नळधारकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र महिला प्रवेशद्वारापासून हटले नाही. याप्रसंगी गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. जिल्हा स्तरावर शासकीय कर्मचाºयाचे संप असल्यामुळे आज तोडगा निघू शकला नाही. योग्य तोडगा निघल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचा दार मोकळा करू, असा निर्धार उपस्थित महिलांनी केला. गावातील महिलांचा रोष पाहता सरपंच व सदस्य कार्यालयाकडे फिरकले नाही. त्यामुळे आक्रोशात वाढ दिसून आली.
राजेदहेगाव ग्रामपंचायतीला नळधारकांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:09 IST
१५ दिवसांपासून गावकरी नळधारकांनी पिण्याचे पाणी मिळाले नाही. ग्रामपंचायत व वरिष्ठ प्रशासनाची दिरंगाईमुळे नळधारक महिलांनी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील कार्यालयाला कुलूप ठोकले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दाखल झाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे याप्रसंगी आवाहन त्यांनी केले.
राजेदहेगाव ग्रामपंचायतीला नळधारकांनी ठोकले कुलूप
ठळक मुद्देपाणीप्रश्न : पोलीस विभागाचे शांततेचे आवाहन