शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे रानमेवा झाला दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:05 IST

उन्हाळ्याची चाहूल लागली की शहरी भागातील नागरिकांना रानमेव्याचे स्मरण होते. वषार्तून एकदाच खायला मिळणारी वस्तू वाट्टेल त्या भावात घ्यायची तयारी असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे रानमेवा दुर्लभ तर झालाच पण जंगलात जाऊन रानमेवा गोळा करुन आणणारे हात रिकामे झाले. त्यांचा व्यवसायही बुडाला.

ठळक मुद्देकोरोना भितीने रानमेवा खरेदीसाठी टाळाटाळमजुराचा व्यवसाय बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागली की शहरी भागातील नागरिकांना रानमेव्याचे स्मरण होते. वषार्तून एकदाच खायला मिळणारी वस्तू वाट्टेल त्या भावात घ्यायची तयारी असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे रानमेवा दुर्लभ तर झालाच पण जंगलात जाऊन रानमेवा गोळा करुन आणणारे हात रिकामे झाले. त्यांचा व्यवसायही बुडाला.पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलात खिरणी, चारं, टेंभरं, चिचबिलाई असा विविध प्रकारच्या फळांचे वृक्ष आहेत. ग्रामीण भागातील मजूर वर्ग दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात रानमेवा जंगलातून गोळा करुन शहरी भागात विक्रीसाठी घेवून येतात. पवनीतील जवाहर गेटच्या आजूबाजूला घेऊन बसतो. परंतू यावर्षी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू असल्याने जंगलात जाऊन रानमेवा गोळा करणे अवघड आहे आणी जंगलातून कसाबसा आणला तरी नेहमी प्रमाणे दुकान लावून बसू शकत नाही.पवनी येथे काही महिला फिरून विक्री करीत होत्या. मात्र दिवसभर फिरूनही विक्री होत नसल्याने कवडीमोल किंमतीत रानमेवा विक्री होत आहेत.गावात फिरुन विकण्याचा प्रयत्न केला तर संसगार्चे भितीपोटी नागरिक अनोळखी व्यक्ती कडून अशा वस्तू विकत घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे यावर्षी रानमेवा दुर्लभ झाला आणी रानमेवा गोळा करणाऱ्या मजूराचा व्यवसाय देखील बुडत असल्याने उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरानामुळे ग्रामीण महिलांवर संकटपवनी तालुक्यात झाडे विपूल प्रमाणात असल्याने रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. वषार्तून एकदाच मिळणारा रानमेव्याला शहरात मोठी मागणी असते. मात्र गत काही दिवसांपासून कोरोना रोगाचा संसगार्चा प्रादुर्भाव वाढत चालल्याने नागरिकांनी रानमेवा खरेदीकडे पाठ फिरविली आहे. यामुळे ग्रामीण महिलांचा रोजगार बुडाला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस