लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर :तुमसर : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका घरकुल लाभार्थ्यांना बसत आहे. घरकुलाचा निधी न मिळाल्याने तुमसर तालुक्यातील अनेक घरकुलाची बांधकामे रखडली आहेत. घरकुल लाभार्थ्यांना किरायाचे पैसे नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुमसर शहरातील घरकुल लाभार्थी शासनाकडे न्यायाची मागणी करीत आहे.सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार असे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य शासन अनेक घरकुला लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करत आहे. तुमसर शहरात सन २०१८ मध्ये सुमारे २५० ते ३०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी दोन लक्ष ५० हजारांचा निधी घरकुलासाठी देण्यात येतो.आतापर्यंत राज्य शासनाने एक लाखाचा निधी घरकुल लाभार्थ्यांना दिला आहे.उर्वरित दीड लाखाचा निधी केंद्र शासनाने अद्यापही दिलेला नाही. एक लाख रूपयाचा निधी लाभार्थ्यांनी घराच्या भिंती उभ्या केल्या आहेत. काहींनी जवळील पैसे खर्च करून घराचा स्लॅब उभारला आहे. तर अनेकांची घरकुल बांधकाम अद्यापही अपूर्णच आहे. अनेकांनी घराचे बांधकाम सुरू केल्याने किरायाचा घराचा आसरा घेतला आहे. त्यामुळे घरमालकांना भाडे देण्यासाठी देखील लाभार्थ्यांकडे पैसे नसल्याने अनेक समस्या सतावत आहेत.कोरोना संकटात जीवनावश्यक गोष्टींचा सामना करत असतानाच घरकुल लाभार्थ्यांना निधी अभावी मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे घरमालकांचे भाडे द्यायचे कसे, असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा आहे.शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांना एक लाखाचाच निधी देण्यात आला. उर्वरित दीड लाख रूपये अजून मिळालेले नाही. घरकुल लाभार्थ्यांना शासनाने किमान भाड्याचे पैसे देण्याची गरज आहे.-डॉ. पंकज कारेमोरे, तुमसर.
लाभार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST
सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार असे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य शासन अनेक घरकुला लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करत आहे. तुमसर शहरात सन २०१८ मध्ये सुमारे २५० ते ३०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी दोन लक्ष ५० हजारांचा निधी घरकुलासाठी देण्यात येतो.
लाभार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका
ठळक मुद्देशहरात घरकूलचे ३०० लाभार्थी : केंद्राचा निधी मिळालाच नाही