संजय साठवणे ल्ल भंडाराअचानक सुरु झालेल्या भारनियमनामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना अखेर आज दिलासा मिळाला. आ.बाळा काशीवार यांनी यासंदर्भात उर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करून साकोली लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील भारनियमन पूर्णत: बंद करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. साकोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यात दि. २० मार्चपासून अचानक कृषीपंपासाठी वीज वितरण कंपनीने १६ तासांचे भारनियमन सुरु केले होते. त्यामुळे फक्त ८ तासांमध्ये शेतीला पंपाचे पाणी होणे अशक्य होते. कारण आता धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज असताना भारनियमनाचा फटका नक्कीच धानपिकाला बसण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सदर भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी आ.काशीवार हे दि. २१ मार्च ला मुंबई येथे रवाना झाले. भारनियमनाच्या मुद्यावर त्यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. साकोली उपविभागासह अन्य भागातील भारनियमन बंद झाले नाही तर धानपिक पूर्णत: करपल्याशिवाय राहणार नाही. भंडारा जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून शेतकऱ्यांना पर्यायी रोजगाराची सोय नसल्याने त्याच्यासमोर मोठी आर्थिक टंचाई निर्माण होईल. यावर उर्जामंत्र्यांनीही तात्काळ निर्णय घेतला व आ.काशीवार यांची मागणी पूर्ण करीत साकोली विधानसभा क्षेत्रातील भारनियमन पूर्णत: बंद करण्याचे आदेश वीज वितरण कंपनीला दिले.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी४भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावू. मात्र काही राजकीय मंडळी शेतकऱ्यांना सरकारच्या विरोधात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी अशा भूलथापांना बळी न पडता खंबीरपणे राहावे. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रीया आमदार काशीवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.आंदोलनाला यश४भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी काल सेंदूरवाफा लवारी, उमरी, परसोडी या गावातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीवर मोर्चा आणला होता. या मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात झाले होते. मात्र शेवटी कार्यकारी अभियंता धनविजय यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून १६ तासांचे भारनियमन ८ तासांवर आणले होते.
साकोली उपविभागातील भारनियमन बंद
By admin | Updated: March 24, 2016 01:14 IST