शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मातीला आकार देणाऱ्यांच्या जीवनाला आधार मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

सडक-अर्जुनी : उन्हाळ्यात कुंभारबांधव मातीला आकार देऊन नवनवीन भांडी तयार करतो. ही भांडी विकलेल्या पैशांतून तो उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी ...

सडक-अर्जुनी : उन्हाळ्यात कुंभारबांधव मातीला आकार देऊन नवनवीन भांडी तयार करतो. ही भांडी विकलेल्या पैशांतून तो उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावत असतो; मात्र यंदा कुंभारबांधवांनी मातीला आकार दिला खरा; पण तयार केलेले माठ खरेदीसाठी लॉकडाऊनमुळे ग्राहक फिरकत नसल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मातीला आकार देणाऱ्यांच्या जीवनाला आधार मिळत नसल्याचे चित्र आहे.

मागील वर्षीपासून लॉकडाऊनमुळे कुंभारबांधवांवर संकट ओढावले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरी आजही फ्रीज नाही. त्यामुळे वाढत्या तापमानाची काहिली दूर करण्याकरिता थंड पाण्याच्या मातीच्या माठाला मोठी मागणी असते. या दिवसात कुंभाराने तयार केलेल्या माठाची सर्वांना आठवण येते. त्यामुळे घरोघरी थंड पाण्याकरिता माठाचा उपयोग केला जातो.

मागील वर्षी व यंदासुद्धा लॉकडाऊनने हा सारा व्यवसायच लॉक झाला आहे. सडक-अर्जुनी शहरात २५ च्या जवळपास कुंभारबांधव आहेत. ते इतरवेळी म्हणजेच कान्होबा, गणपती, शारदा, दुर्गा, लक्ष्मी आदी मूर्ती तयार करतात तसेच दिवाळीला मातीचे दिवेदेखील तयार करतात. याच व्यवसायातून आलेल्या मिळकतीतून उदरनिर्वाह करतात. वंशपरंपरागत चालत आलेला हा त्यांचा व्यवसाय आहे; परंतु आजघडीला पार कोलमडून गेला आहे. लॉकडाऊनमुळे माठांची खरेदी करण्यासाठी ग्राहक त्यांच्याकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे तर त्यांनासुद्धा बाहेरगावी माठ विक्रीसाठी जाता येत नसल्याने त्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने कुंभार समाजबांधवांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.

सध्या व्यवसाय ठप्प झाला आहे. आठवडी बाजार बंद आहे. बाहेरगावी जाता येत नाही आणि बाहेरगावावरून ग्राहक येत नाहीत. चौकात दुकान लावले, तर ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते. सध्या सकाळी ११ पर्यंतच दुकानांची वेळ आहे. विक्री होत नाही. जीवन कसे जगावे, हाच प्रश्न आहे.

विलास पात्रे, सडक-अर्जुनी.