शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळीसाठी भंडारात लाभार्थ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

भंडारा शहरात महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात शिवभोजन थालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमुर्ती चौक स्थित महसूल उपहारगृहाचे संचालक राहूल लिमजे म्हणाले, आम्हाला एका दिवसासाठी १०० थाळीचे लक्ष दिले आहे. परंतु आमच्याकडे त्यापेक्षा अधिक लाभार्थी येतात. दुपारी १२ ते २ या वेळात शिवभोजन थाली दिली जाते.

ठळक मुद्देशहरात दोन ठिकाणी सुविधा : दहा रूपयात दोन पोळ्या, वरण आणि भाजी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन थाली योजनेला भंडारा शहरात लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दहा रूपयात मिळणाऱ्या थाळीच्या नोंदणीसाठी रांगा लागल्याचे शहरातील दोनही केंद्रावर दिसून येत आहे. याठिकाणी लाभार्थ्यांना दोन पोळ्या, वरण आणि भाजी दिली जाते. मात्र दोनही ठिकाणी प्रत्येकी १०० थाळीचीच व्यवस्था असल्याने अनेकांना या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.भंडारा शहरात महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात शिवभोजन थालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमुर्ती चौक स्थित महसूल उपहारगृहाचे संचालक राहूल लिमजे म्हणाले, आम्हाला एका दिवसासाठी १०० थाळीचे लक्ष दिले आहे. परंतु आमच्याकडे त्यापेक्षा अधिक लाभार्थी येतात. दुपारी १२ ते २ या वेळात शिवभोजन थाली दिली जाते. मात्र त्यासाठी अ‍ॅपवर नोंदणी केली जाते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाते. येथील भोजनाचा दर्जाही उत्कृष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले. एक थाळी ५० रूपयात पडत असून यासाठी शासनाकडून ४० रूपये प्रती थाळी अनुदान मिळणार आहे. गोरगरीबांसाठी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या उपहारगृहातही अशीच अवस्था आहे. येथेही दुपारी १२ वाजतापासून शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी रांग दिसून येते. एका थाळीत ३० ग्रॅम वजनाच्या दोन पोळ्या, १५० ग्रॅम वरण आणि १५० ग्रॅम भाजी दिली जाते. सदर केंद्र नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्राद्वारा संचालन केले जाते. या केंद्राच्या संचालिका रंजना खोब्रागडे म्हणाल्या, अतिशय स्वस्त दरात भोजन उपलब्ध होत असल्याने वेळेपुर्वीच अनेकजण येथे रांग लावून असतात.महसूल उपहारगृहात गत दोन दिवसांपासून भोजन करण्यासाठी येणाºया शहापूर येथील विजया अवाळ आणि लाखनीच्या पूनम येडेकर म्हणाल्या, येथे मिळणारे जेवण स्वादिष्ट असते. बाहेर मिळणाºया नास्त्याच्या किंमतीत येथे जेवण होते. तर आॅटो रिक्षा चालक सचिन बागडे म्हणाले, या योजनेने गोरगरीबांना वेळेवर दोन घास मिळतील.सध्या या योजनेंतर्गत प्रत्येकी १०० म्हणजे दिवसभरात २०० जणांना शिवथाळी दिली जाते. परंतु अनेकांच्या पदरी निराशा येते. त्यामुळे अतिरिक्त शिवभोजन थाळी उघडण्याची गरज आहे.अ‍ॅपच्या माध्यमातून पारदर्शकताशिवभोजन थाळी वितरणात पारदर्शकता राखली जाते. येथे येणाºया प्रत्येकाची नोंदणी अ‍ॅपच्या माध्यमातून घेतली जाते. एवढेच नाही तर अ‍ॅपवर लाभार्थ्याचा फोटोही अपलोड केला जातो. ज्या लाभार्थ्याचा फोटो अ‍ॅपमध्ये अपलोड होता त्यालाच थाळी दिली जाते. आणि केंद्र चालकांना अनुदान मिळते. गुगल मॅप लोकेशनद्वारेही यावर लक्ष ठेवले जात आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय