शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पुलावरून जीवघेणी वाहतूक; प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 16:16 IST

२४ नाेव्हेंबरला जिल्हा प्रशासनाने कारधा जुना पुलावरील वाहतूक कायमस्वरूपी बंद केली. त्या दिवसापासून येथून रहदारी बंद हाेती. मात्र, २-३ दिवसांपासून या नदीपुलावरील दाेन्ही बाजुकडील लाेखंडी रेलिंग नसल्याचा फायदा दुचाकीस्वार उचलत आहे.

ठळक मुद्देनवीन पुलावरही सुमार गर्दी

भंडारा : जिल्हा प्रशासनाने १८ दिवसांपूर्वी वैनगंगा नदीवरील जुना कारधा पुलावरील रहदारी कायमस्वरूपी बंद केली. मात्र, पुलावरील लाेखंडी कठडे नसल्याने नागरिकांची येथून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दाेन्ही बाजूने अशी व्यवस्था झाली आहे.

गाेसेखुर्द प्रकल्पांतर्गत वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ करण्यात आली आहे. २४५.५० मीटर जलसाठा वाढविण्यापर्यंत निर्णय झाला आहे. त्या दिशेने कार्यही सुरू आहे. जलपातळीत वाढ हाेत असतानाच २४ नाेव्हेंबरला जिल्हा प्रशासनाने कारधा जुना पुलावरील वाहतूक कायमस्वरूपी बंद केली. त्या दिवसापासून येथून रहदारी बंद हाेती.

मात्र, दाेन ते तीन दिवसांपासून या नदीपुलावरील दाेन्ही बाजुकडील लाेखंडी कठडे नसल्याचा फायदा दुचाकीस्वार उचलत आहे. अगदी दाेन फुट अंतरावर रॅलींगच्या बाजूला कच्चा रस्ता आहे. याच रस्त्यावरून कठडा ओलांडत जुना पुलावरून वाहतूक सुरू आहे. कठडा नसल्याने केव्हा माेठी अनुचित घटना घडेल याचा नेम नाही. मात्र नागरिकही जीव मुठीत घेऊन जमिनीवरील लाेखंडी रॅलिंग पार करीत वाहतूक करीत आहेत.

इंग्रजकालीन या पुलाने शंभरी गाठली आहे. परिणामी हा पूल २०१६ मध्येच जिल्हा प्रशासनाने जड वाहतुकीसाठी बंद केला हाेता. तेथून ग्रामवासीयांच्या आग्रहास्तव फक्त दुचाकी वाहतूक सुरू हाेती. या पुलावरून ग्रामीण भागातून माेठ्या प्रमाणात मजूर वर्ग भंडारा शहरात येत असे. आजही वाहतूक बंद असली तरी सायकलने येणारे काही मजूर या पुलावरून येत आहेत. आतातर लाेखंडाची रॅलिंग नसल्याने दुचाकीस्वारांचे चांगलेच फावले आहे. जीवावर बेतून हा सर्व प्रकार सुरू आहे. याकडे जिल्हा प्रशासन काेणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जबाबदारी कुणाची ?

वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाल्याने जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा भार नवीन पुलावर आला आहे. मजूरवर्ग व दुचाकीधारक जीव मुठीत घेवून मोठ्या पुलावरही रहदारी करीत आहे. जुना पुलावरुन वाहतूक बंद झाल्याचा संतापही व्यक्त करण्यात येत असताना जुना पुलावरुन वाहतूक बंद झाल्याचा संतापही व्यक्त करण्यात येत असताना जुना पुलावरील धोक्याची वाहतूक होत आहे. यात अनुचीत घटना घडल्यास जबाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होतो.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकriverनदी